ashadi wari sant tukaram maharaj palkhi at baramati wari pandharpur warkari culture  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : चालों वाटें आम्हा तुझाचि आधार! पंढरीकडे निघालेला वैष्णवाचा सोहळा बारामतीत मुक्कामी

संत तुकाराम महाराज यांचा यंदाच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील आजचा नववा दिवस

राजेंद्रकृष्ण कापसे

बारामती : सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा… जेवणानंतर ऊन आणि सावलीचा खेळ… बारामतीजवळ पावसाचा किरकोळ शिडकावा… त्यानंतर पंढरीकडे निघालेला वैष्णवाचा सोहळा बारामतीत मुक्कामी सुखावला. दरम्यान, सोहळा उद्या इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. संत तुकाराम महाराज यांचा यंदाच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालीतील आजचा नववा दिवस आहे.

‘जेथें जातों तेथें तू माझा सांगाती।’ या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठुराया आम्हाला तूच आमचा हात धरून चालवतोस. जून महिना निम्मा संपला अद्याप पाऊस नाही. ऊन खूप आहे. चालताना त्रास होतोय, पण विठुराया तू दाखविलेल्या मार्गाने आम्ही चालत आहोत. तूच आमच्या पाठीशी खंबीरपणे आहेस. अशी अपेक्षा ठेऊन वारकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.

उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने पादुकांना अभिषेक करण्यात आला. चोपदार नामदेव गिराम यांनी सूचना करताच सोहळा बारामतीच्या दिशेने मार्गस्थ झाला. उंडवडीच्या पठारावर सोहळ्याने पहिला विसावा घेतला. बऱ्हाणपूर फाटा येथे दुपारच्या विसाव्यासाठी सोहळा बारा वाजता पोचला. ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर मांडव उभारला होता.

दुपारी जेवण केल्यानंतर सोहळा बारामतीकडे चालू लागला. मोरेवाडी येथे विसावा घेत पालखी सोहळा संध्याकाळी बारामतीच्या बाजारपेठेत आला. यावेळी, देशमुख चौकात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून पादुकांचे सपत्नीक दर्शन घेतले. नंतर सातच्या सुमारास शारदा मंदिराच्या प्रांगणात मुक्कामी विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT