Babasaheb Ambedkar Marathwada University 
संस्कृती

पदवीचा मराठी ‘मायबोली’ नूतन अभ्यासक्रम

उपयोजित, व्यावहारिक कौशल्यासह बालसाहित्य

सुहास सदाव्रते

जालना - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीचा मराठी भाषेचा अभ्यासक्रम निवड आधारित श्रेयांक पद्धतीने तयार करण्यात आला आहे.भारतीय भाषा मराठी अशी नवी ओळख घेत ‘मायबोली’ या शीर्षकाने बदल करण्यात आला आहे.उपयोजित,व्यावहारिक कौशल्यासह बालसाहित्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे,हे विशेष.

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या पदवीचा मराठी आवश्यक व ऐच्छिक विषयाचा नवा अभ्यासक्रम तयार झाला आहे.विविध चार अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून नवीन बदलाचा वेध पाठ्यक्रमात घेण्यात आला आहे. अभंग,कथा,प्रवासवर्णन, ललित गद्य,विज्ञान कथा,आधुनिक कविता,बालसाहित्य अशी रचना आहे. मराठी साहित्यातील विविध प्रवाहांचा परिचय पाठ्यक्रमात दिसून येतो.भाषिक लेखनाचा स्तर उंचावण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

मराठीतील वैविध्यपूर्ण सृजनविष्कार आस्वाद घेण्याची अभिरुची निर्माण होईल असे गद्य,पद्य पाठ जाणीवपूर्वक निवडण्यात आले आहे. पद्य पाठात महात्मा बसवेश्वर वचने,संत ज्ञानेश्वरांच्या ओवी,संत सोयराबाई, संत एकनाथ,संत तुकाराम यांचे अभंग आहेत. गद्य पाठात महानुभाव संप्रदायातील केशिराज बास, महात्मा फुले, ताराबाई शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वामनदादा कर्डक यांचे प्रेरक साहित्य आहे.उपयोजित लेखनात पुस्तक परिचय, नाट्य परीक्षण, पटकथा लेखन, जाहिरात लेखन,गीत लेखन,ब्लॉग लेखनाचा समावेश आहे. बालसाहित्यात महावीर जोंधळे यांची शिवाची वाडी ही बालकादंबरी, सूर्यकांत सराफ यांचे ‘मिशी हरवली आहे’ हे बालनाट्य, भारतीय श्रेष्ठ बालकथा हे लेखक बाबा भांड यांचे संपादन समावेश आहे.

अभ्यासक्रमाचे वेगळेपण

  • लेखिका रेखा बैजल यांची ‘क्लोरोफिल’ या कथेचा समावेश

  • नवीन अभ्यासक्रम हा निवड आधारित श्रेयांक पद्धतीचा

  • ऐच्छिक मराठीच्या संपादित पुस्तकांना संतसाहित्याचे अभ्यासक किशोर सानप, कादंबरीकार राजन गवस, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांची प्रस्तावना

  • पूर्वीचा द्वितीय भाषा हा पेपर आता भारतीय भाषा म्हणून अभ्यासावा लागेल.

  • मराठीतील अभिजात साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश

  • यावर्षीपासून विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.

  • जर एखादा पेपर आवडला नाही तर विद्यार्थी दुसऱ्या पेपरचा अभ्यास करून परीक्षा देऊ शकतील.

पदवी अभ्यासक्रमाचा मराठी भाषा अभ्यासक्रम नवीन आहे. बदलत्या अनेक घटकांचा संदर्भ विचारात घेण्यात आला आहे. अभिजात साहित्यासह उपयोजनाला प्राधान्य देण्यात आले आहे.

-डॉ.यशवंत सोनुने अभ्यास मंडळ सदस्य

पदवी वर्ग मराठी भाषा अभ्यासक्रमाची ओळख आता ‘भारतीय भाषा मराठी’ अशी राहणार आहे. अभ्यास मंडळाने तयार केलेले ‘मायबोली’सह चार अभ्यासपत्रिका पाठ्यक्रमाचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

-डॉ.दासू वैद्य अध्यक्ष, मराठी भाषा अभ्यास मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT