Daily Panchang 11 March 2023
Daily Panchang 11 March 2023 Sakal
संस्कृती

Panchang 11 March : निळे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ११ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २० शके १९४४

आज सूर्योदयाची वेळ ही ०६:५० वाजता तर सूर्यास्ताची वेळ ही १८:४० वाजता आहे. आज चंद्रोदय २२:०४ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:३७ ते स.०६:५०दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:४० ते १९:५३ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:१८ दरम्यान होणार.

आज प्रदोषकाळ हा १८:४० ते २१:०६ वाजता आहे तर निशीथ काळ हा २४:२० ते २५:०९ दरम्यान आहे. आज राहू काळ हा ०९:४७ ते ११:१६ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा १४:१३ ते १५:४२ दरम्यान आहे. आज श्राद्धतिथी ही चतुर्थी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१७ ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मुळा खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे. (daily Panchang 11 March 2023)

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १४:१३ ते १५:४२

  • अमृत मुहूर्त -   १५:४२ ते १७:११

  • विजय मुहूर्त - १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर, मंगळ मुखात आहुती आहे.शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - शिशिर(सौर)

  • मास - फाल्गुन

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्थी(२०:०७ प.नं.पंचमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - स्वाती(३०:०९ प.नं.विशाखा)

  • योग - ध्रुव(१८:३० प.नं. व्याघात)

  • करण - बव(०८:१४ प.नं.बालव)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - कुंभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्री व्यासतीर्थ पु.ति, सर्वार्थसिद्धियोग ३०:०९ प.

या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष , वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT