Daily Panchang
Daily Panchang Sakal
संस्कृती

Panchang 25th sept: रविवारी केशरी वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (daily panchang 25 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन ३ शके १९४४

आज सूर्योदय हा ०६:२७ वाजता तर सूर्यास्त १८:२५ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही ०५:१६ ते स.०६:२७ दरम्यान होणार. सायं संध्या १८:२५ ते १९:३७ दरम्यान होणार. अपराण्हकाळ हा १३:३८ ते १६:०१ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १८:२५ ते २०:४९ दरम्यान होणार. निशीथ काळ हा २४:०२ ते २४:५० दरम्यान होणार तर राहु काळ हा १६:५५ ते १८:२५ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा १२:२६ ते १३:५६ दरम्यान होणार तर आज श्राद्धतिथी ही अमावास्या श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०२:२६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी परान्न घेवू नये. या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०९:२७ ते १०:५६

  • अमृत मुहूर्त -  १०:५६ ते १२:२६

  • विजय मुहूर्त - १४:२६ ते १५:१४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर सूर्य मुखात आहुती आहे. शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अमावास्या(२७:०४ प.नं. प्रतिपदा)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(अहोरात्र)

  • योग - शुभ(१०:४७ प.नं.शुक्ल)

  • करण - चतुष्पाद(१४:४९ प.नं. नाग)

  • चंद्र रास - सिंह (१२:०३ नं.कन्या)

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

विशेष:- दर्श-स्नानदानासाठी अमावास्या, सर्वपित्री अमावास्या, अमावास्या श्राद्ध, अन्वाधान, ब्रह्मानंद स्वामी पु.ति(कागवाड), सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दु.१२:०३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT