Panchang 21st sept: बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:०३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchangsakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ (daily panchang 21 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ३० शके १९४४

आज सूर्योदय ०६:२६ वाजता तर सूर्यास्त १८:२८ वाजता सुरू होणार. आज चंद्रोदय हा २६:१३ वाजता होणार. प्रात: संध्या ही स.०५:१५ ते स.०६:२६ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १८:२८ ते १९:४० दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:४० ते १६:०४ दरम्यान होणार तर प्रदोषकाळ हा १८:२८ ते २०:५२ दरम्यान होणार.

आज निशीथ काळ हा २४:०४ ते २४:५२ दरम्यान होणार तर आज राहु काळ हा १२:२८ ते १३:५८ दरम्यान होणार. आज यमघंट काळ हा ०७:५७ ते ०९:२७ दरम्यान होणार तर आज श्राद्धतिथी ही एकादशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:०३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी भात खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Daily Panchang
panchang: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त -  १६:५८ ते १८:२८

  • अमृत मुहूर्त - ०७:५८ ते ०९:२७

  • विजय मुहूर्त - १४:२८ ते १५:१६

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर राहु मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - एकादशी(२२:२५ प.नं. द्वादशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पुष्य(२३:५७ प.नं.आश्लेषा)

  • योग - परिघ(१०:३३ प.नं.शिव)

  • करण - बव(०९:२५ प.नं. बालव)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

Daily Panchang
Panchang 16th sept: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

विशेष:- इंदिरा एकादशी (उपवास), एकादशी श्राद्ध, श्री जयराम स्वामी पु.ति(वडगांव)

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. श्री विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com