Banjara community Diwali file photo sakal
संस्कृती

दिवाळीच्या दिवशी अविवाहित मुली दिवे घेऊन घरोघरी का फिरतात?

भाग्यश्री राऊत

नागपूर : हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी (Diwali 2021) हा सण पाच दिवसांचा साजरा करतात. दिवाळी म्हटलं की लक्ष्मी पूजा, दिवे, रांगोळी, मिठाई, फटाके असं सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण, बंजारा समाजामध्ये (Banjara Community Diwali Celebration) अविवाहित मुली घोळक्याने दिवे घेऊन घरोघरी फिरतात आणि ''मेरा'' मागतात. पण, या मुली असं नेमकं दिवाळीच्या दिवशी घरोघरी का फिरतात? हेच आपण जाणून घेऊयात.

बंजारा समाजातील लोक आधी कामासाठी भटकत राहायचे. त्यांचा जिथं मुक्काम असेल त्याला तांडा म्हणायचे. पण, आता हा समाज स्थिरावला आहे. त्यांच्या गावाला आताही 'तांडा' म्हणतात. या तांड्याचा एक प्रमुख व्यक्ती असतो त्याला ''नायक'' म्हणतात. त्यानंतर ''कारभारी'', त्यापाठोपाठ ''डाव'' असतो. त्यानंतर तांड्यातील सर्व प्रतिष्ठीत व्यक्तींना ''आसमी'' म्हणतात.

दिवाळीच्या दिवशी अविवाहित मुली घरोघरी दिवे घेऊन फिरतात -

बंजारा समाजात दिवाळी ही दोन दिवसांची साजरी केली जाते. बंजारा गोरबोली भाषेत त्याला ''दवाळी'' असे म्हणतात. अविष्न अमावस्येचा दिवस हा बंजारा समाजातील दिवाळीचा पहिला दिवस असतो. याच दिवशी सायंकाळी तांड्यातील अविवाहीत मुली दिवे लावलेली पणती म्हणजेच बंजारा बोलीमध्ये त्याला ''ढाकळी'' असं म्हणतात. या पणती हातात घेऊन तांड्यातील नायकाच्या घरी जातात. तिथे त्यांना ओवाळणी करतात. त्यानंतर तांड्यातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवळणी करतात. यावेळी

''याडी तोण मेरा

बापू तोण मेरा

वर्शेदाडेरी कोड दवाळी

बापू तोण मेरा''

असं बंजारा बोली भाषेतील गीत म्हणतात. अर्थात बापू मी तुला ओवाळत आहे, तू मला मेरा दे आणि तुला मी भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे, असा त्याचा अर्थ होतो. या मुली प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना ''मेरा'' दिला जातो. मेरा म्हणजे ओवाळणी. त्यावेळी आपआपल्यापरीने त्यांना पैसे दिले जातात.

दुसरा दिवस म्हणजे गोधनाची पूजा -

दिवाळीच्या दुसऱ्या दिवळी भल्या पहाटेच रानात जातात. रानातून तिकाडी नावाचे गवत आणि फुले आणतात. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी गाईच्या शेणापासून गोधण बनवतात. या गोधणावर फुले आणि गवत रोवून त्याची पूजा करतात. तांड्यातील सर्वच अविवाहीत मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन पूजा करतात. या दिवशी या सर्व मुलींचा उपवास असतो. गोधणाची पूजा झाल्याशिवाय त्या अन्नाला स्पर्श सुद्धा करत नाहीत. त्यानंतर तांड्याचा प्रमुख म्हणजे नायक त्यांना जवेणाचे आमंत्रण देतो.

मुली घरोघरी दिवे घेऊन का फिरतात? -

दिवाळीच्या दिवशी सायंकाळी मुली घरोघरी आणि मंदिरात दिवे घेऊन फिरतात. यावेळी त्या मेरा मागतात. यावेळी घरातील ज्येष्ठांना ओवाळतात. ही खूप आधीपासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामागे विशिष्ट असे कारण नाही. पण, या समाजात मुलीला लक्ष्मीच्या रुपात बघतात. ही लक्ष्मी दिवा घेऊन ज्याच्या घरी जाईल त्याच्या घराची वृद्धी होवो, असा त्यामागे अर्थ असावा, असं भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मोहन चव्हाण सांगतात.

गाईंनाही ओवाळतात -

ज्या वस्तूपासून उत्पन्न मिळते त्या सर्व वस्तूंची या मुली पूजा करतात. दिवाळीच्या दिवशी गाईंना देखील ओवाळले जाते. म्हणजेच आमच्याकडे असलेल्या धनाची वृद्धी होवो, असा उद्देश त्यामागे असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोधणाची पूजा करण्यासाठी देखील या मुली प्रत्येकाच्या घरी घोळक्याने जातात. फक्त माझ्या घराची नाहीतर आमच्या संपूर्ण तांड्याची प्रगती व्हावी, असा त्यामागे उद्देश असतो, असंही मोहन चव्हाण सांगतात.

अविवाहीत मुलीच का? -

बंजारा समाजाच्या प्रत्येक सणामध्ये अविवाहीत मुलींना महत्व दिले जाते. कुठलाही उत्सवामध्ये त्यांचा पुढाकार असतो. कारण, तिला लक्ष्मीच्या रुपात बघतात. दिवाळीप्रमाणे होळी, तीज हे सण देखील मोठ्या उत्साहाने आणि वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT