संस्कृती

Diwali Bath Mistakes : अभ्यंगस्नानावेळी करू नका 'या' चूका; पडाल वर्षभर आजारी!

र्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीला आयुर्वेदातही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सकाळ डिजिटल टीम

Diwali Bathing Mistakes : वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळीला आयुर्वेदातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीची प्रत्येक गोष्ट आरोग्याशी संबंधित आहे. दिवाळीत फराळ करणे, उटणे लावून अभ्यंगस्नान करणे याला शास्त्रात महत्त्व आहे.

तसेच, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज अंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज अंघोळ केल्याने शरीराची चपळता आणि स्वच्छता देखील होते. दररोज अंघोळ करणे अनेक प्रकारच्या आजारांपासून रक्षण करते.

अनेक लोक अभ्यंगस्नानावेळी काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आज आपण अभ्यंगस्नान करताना केणत्या चुका टाळाव्यात त्याबद्दल जाणून घेऊयात.

जास्त वेळ अभ्यंगस्नान नको

अभ्यंगस्नान करताना ते पहाटे करण्यास सांगितले जाते. अशावेळी ते कमी वेळेत करणे फायद्याचे ठरते. आपली त्वचा बॅक्टेरिया आणि नैसर्गिक तेल शरीरावर तयार करते. जे त्वचेला मॉइश्चराइज करते. जास्तवेळ अंघोळ केल्याने आपण शरीर वारंवार धुतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अधिक वेळ अंघोळ करणे चुकीचे ठरू शकते. तसेच अभ्यंगस्नान करताना उटणे वापरावे यामुळे त्वचेचील आद्रता टिकून राहते.

साबणाऐवजी उटणे लावा

चुकीचा साबण वापरणेदेखील तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. काहीवेळा केवळ सुगंध चांगला म्हणून साबण निवडला जातो. पण, तो आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे अभ्यंगस्नान करताना उटण्याचा वापर करावा. साबणाऐवजी आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

अभ्यंगस्नानाला कडक पाणी नको

अभ्यंगस्नान करताना नेहमी कडक पाणी वापरू नका. यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतील. तसेच, जर तुम्हाला सोरायसिस किंवा एक्जिमासारख्या त्वचारोग असतील तर तुम्ही गरम पाणी नक्कीच टाळावे. तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाणी वापरण्याचा सल्ला आयुर्वेद देते.

दररोज केस धुऊ नका

दिवाळीच्या पहिल्या अंघोळीनंतर पाडवा भाऊबीज. या दिवशीही लोक अभ्यंगस्नान करतात. पत्नी, बहीण, आई घरातील पुरूषांना अंघोळ घालतात. त्यामुळे सतत डोक्यावरून अंघोळ करणे येतेच. आधीच थंडीचा ऋतू असतो त्यामुळे सर्दी होऊ शकते. त्यामुळे या काळात वारंवार केस धुणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT