

Flyga Volvo Cars Pune
ESakal
फ्लाइगा वोल्वो कार्स पुणे यांनी काल शिवाजीनगर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात एकाच वेळी 11 लक्झरी वोल्वो एक्ससी 90 गाड्यांची विक्रमी डिलिव्हरी केली. पुण्यातील लक्झरी कार बाजारासाठी ही एक महत्त्वाची घटना मानली जात असून वोल्वो एक्ससी 90 गाड्यांच्या सर्वात मोठ्या एकावेळी झालेल्या डिलिव्हरींपैकी ही एक आहे. या 11 लक्झरी गाड्यांच्या किल्ल्या शिवम असोसिएट्सचे सीएमडी आणि संस्थापक डॉ. शिवानंद एस. नीलन्नवर यांना सुपूर्द करण्यात आल्या.