DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

TVK Warns of Mass Resignation टीव्हीके पक्षानं डीएमके आणि एआयडीएमकेनं राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. या इशाऱ्याने तामिळनाडुच्या राजकारणात खळबळ उडालीय.
108 TVK MLAs May Quit Over Government Formation Move says sources

108 TVK MLAs May Quit Over Government Formation Move says sources

Esakal

Updated on

DMK AIADMK Alliance Talks Trigger Political Storm तामिळनाडुतील सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला बहुमत गाठता आलं नाहीय. टीव्हीकेचा प्रमुख थलपती विजयने राज्यपाल आर्लेकर यांची दोन वेळा भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र बहुमताचा आकडा घेऊन या असं राज्यपालांनी स्पष्ट सांगितलंय. दरम्यान, आता टीव्हीके पक्षानं डीएमके आणि एआयडीएमकेनं राज्यात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास आमचे सर्व आमदार राजीनामा देतील असा इशारा दिला आहे. एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com