Diwali Lakshmipujan 2023 esakal
संस्कृती

Diwali Lakshmipujan 2023 : आज आहे लक्ष्मीपूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे खास महत्व असते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Lakshmipujan 2023 : सर्व सणांमध्ये दिवाळी ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. आपल्या देशात दिवाळीचा सण हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली असून, आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी आहे.

यंदा दिवाळी ९ नोव्हेंबरला वसूबारसपासून सुरू झाली असून १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण झाल्यावर दिवाळी समाप्त होणार आहे. वसूबारस आणि धनत्रयोदशीचा सण नुकताच साजरा करण्यात आला आहे. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत.

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचे खास महत्व असते. या दिवशी आपण सर्वजण देवी लक्ष्मी, माता सरस्वती, भगवान विष्णू आणि गणपती या देवी-देवतांची आवर्जून पूजा करतो. आज लक्ष्मीपूजन आहे आणि या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

लक्ष्मीपूजन

यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते. तसेच, भगवान विष्णू, माता सरस्वती आणि गणपती यांची विशेष पूजा केली जाते. या पूजेला खास महत्व आहे.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.

लक्ष्मीपूजनाचे महत्व

धन आणि समृद्धीची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखले जाते. लक्ष्मीच्या कृपेमुळे आपल्या घरात सूख-शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेचे खास असे महत्व आहे.

या दिवशी केरसुणी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश, इत्यादी गोष्टींना विशेष महत्व आहे. त्यामुळे, देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींचे खास पूजन केले जाते. ही पूजा योग्य पद्धतीने केल्याने आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते अशी देखील मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT