Sankashti Chaturthi sakal
संस्कृती

Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला करा 'या' गोष्टी, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

जर तुम्हाला काही पैशासंबंधी अडचणी येत असेल तर तुम्ही आज हे उपाय करा.

सकाळ डिजिटल टीम

आज संकष्टी चतुर्थी. चतुर्थीला शास्त्रात रिक्त तिथी मानून अशुभ म्हटलंय पण या दिवशी गणपतीची (Ganpati) पूजा केल्याने त्याचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो. विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थीला काही खास उपाय केले तर तुमच्या घरी पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही पैशासंबंधी अडचणी येत असेल तर तुम्ही आज हे उपाय करा. (do these things on Sankashti Chaturthi lord ganeshji will show grace on you )

एका वर्षात तब्बल 24 चतुर्थी असतात. या प्रत्येक चतुर्थीला तुम्ही गणपतीची आराधना केली किंवा पूजा अर्चना केली तर तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. घरात सुख समृद्धी लाभेल. बिघडलेली कामे दूर होतील. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय करा.

1. चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जा आणि गणपतीचा पंचामृताने अभिषेक करा.

२. गणेशजींना लाल वस्त्र, जास्वंदाचे फूल आणि दूर्वा अर्पण करा.

३. डोळे मिटून 5 मिनिट गणेशजीचा कोणताही एका मंत्राचा जाप करा.

४. या दिवशी उपवास करा. यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहते.

५. दानधर्म करावा. यात अन्नदान प्रामुख्याने करावे.

६. या दिवशी दुर्वा आणि हळदीच्या 11 गुंठ्या पिवळ्या कापडात बांधून घरच्या मंदिरात ठेवा आणि त्याची पुढे दहा दिवस पूजा करा. त्यानंतर ही घरच्या तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्याकडे पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.

७. गणपतीला प्रसाद म्हणून मोदक किंवा लाडूचा भोग द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: शिपायाचा पगार जाणार लाखाच्या घरात! आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव

Viral Video : ‘’मी सहन करू शकलो नाही.., मी राजीनामा दिलाय... ’’, सांगत चक्क जीएसटी उपायुक्त पत्नीशी बोलताना ढसाढसा रडले!

Latest Marathi News Live Update : गायिका अंजली भारतीच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Video: कचऱ्यात पडलेल्या देवाच्या मूर्ती मुस्लिम व्यक्तीने उचलल्या; स्वच्छ करुन केलं विसर्जन, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून अमित शहांच्या पत्नीने काय केलं असंकाही की, तुम्हीही कौतुक कराल

SCROLL FOR NEXT