Dream Astrology sakal
संस्कृती

Dream Astrology: तुम्हालाही स्वप्नात भांडणे आणि वादविवाद दिसतात? जाणून घ्या याचा दैनंदिन आयुष्याशी काय आहे संबंध

Why You See Fights in Dreams: स्वप्नात भांडण किंवा वाद दिसणं यामागचं ज्योतिषशास्त्रीय आणि मानसिक अर्थ जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Astrology Behind Fighting Dreams: आपण झोपेत असताना अनेकदा वेगवेगळी स्वप्नं पाहतो. ही स्वप्नं कधी आनंददायक असतात, तर कधी विचित्र किंवा भीतीदायक. काही स्वप्नं आपण आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडून पाहतो. असंच एक सामान्य पण अनेकदा पडणारं स्वप्न म्हणजे एखाद्याशी भांडण किंवा वाद होत असल्याचं दृश्य. स्वप्नशास्त्रानुसार अशा प्रकारच्या स्वप्नांचा अर्थ नेमका काय असतो? चला, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

जोडीदारासोबत भांडण

स्वप्नात जर तुम्ही आपल्या जोडीदाराशी भांडताना दिसत असाल, तर ते तुमच्या नात्यात सध्या काही तणाव असल्याचं संकेत देऊ शकतं. अशा स्वप्नांमुळे तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. हा एक इशारा असतो की नात्यात पारदर्शकता आणि समजून घेणं गरजेचं आहे.

स्वप्नात मित्राशी भांडण

जर तुम्ही स्वप्नात आपल्या जवळच्या मित्राशी वाद करताना दिसत असाल, तर हे स्वप्न तुमच्या प्रत्यक्ष आयुष्याशी संबंधित असू शकतं. याचा अर्थ असा होतो की तुमचा मित्र सध्या कोणत्यातरी अडचणीत आहे किंवा तुमच्यात लवकरच मतभेद होऊ शकतात. अशा वेळी संबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि संवाद आवश्यक ठरतो.

मनात दडलेल्या भावना

स्वप्नात भांडणं पाहणं हे केवळ इतरांशी संबंध दाखवत नाही, तर तुमच्या मनातील दडलेल्या भावना, तणाव किंवा अस्वस्थतेचाही इशारा असू शकतो. कधी कधी अशा स्वप्नांच्या माध्यमातून आपण आपल्या अंतर्मनातील असमाधान व्यक्त करत असतो.

दुसऱ्याला रागावताना पाहणं

जर स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्यावर रागावलेला पाहत असाल, तर स्वप्नशास्त्रानुसार हे तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत काही बदल होण्याचे संकेत देतं. हे बदल सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकतात, त्यामुळे सावध राहणं योग्य ठरतात.

आर्थिक लाभाचा संकेत

स्वप्नात भांडणं पाहणं केवळ नकारात्मक अर्थच देत नाही, तर काही वेळा हे स्वप्न धनलाभ, यश, किंवा समाजात प्रतिष्ठा मिळण्याचंही संकेत देऊ शकतं. विशेषतः जेव्हा तुम्ही त्या स्वप्नात स्वतःला धाडसीपणे परिस्थितीचा सामना करताना पाहता, तेव्हा ते यशाच्या दृष्टीने शुभ संकेत मानलं जातं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT