England Sheffield Marathi Culture
England Sheffield Marathi Culture sakal
संस्कृती

England Sheffield Marathi Culture: इंग्लंडमध्ये आहात? शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाबद्दल जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

England Sheffield Marathi Culture: आपल्या मराठी मंडळींचे आणि एकूण भारतीयांचे एक विशिष्ट लक्षण आहे. ते म्हणजे आपण जरी भारतातून बाहेर आलो, तरी भारतीय संस्कृती काही आपल्यातून बाहेर जात नाही.

ह्यातूनच प्रेरणा घेऊन अमेरिका, दुबई, सिंगापूर, इंग्लंड या देशांमध्ये मराठी समाजाने एकत्र येऊन मराठी मंडळे स्थापन केली.(Latest Marathi News)

त्यापैकी एक म्हणजे शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळ. दक्षिण यॉर्कशायर ह्या कौंटी मधील शेफील्ड हे सर्वांत मोठे शहर. साधारण ६ लाख लोकवस्तीच्या ह्या शहरांत १९९० पासून शंभरच्यावर मराठी कुटुंबे नांदतात.

ह्या मंडळाची सुरुवात मराठी संस्कृतीच्या आंतरिक ओढीनेच झाली. नव्वदीपासून मराठी कुटुंबे राहत असूनही एक समान छत्राच्या अभावामुळे अजून तरी मंडळी संघटीत नव्हती.(Marathi Tajya Batmya)

  • आजच्या आधुनिक डिजिटल युगात, जितकी मराठी कुटुंबे ह्या आणि शेफिल्डच्या

  • आसपासच्या परिसरात राहतात, त्यांना एकत्र आणणे यासाठी संस्थात्मक

  • चळवळ गरजेची होती. ती चळवळ म्हणजेच शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळ.

  • मंडळाच्या पायाभरणीच्या वेळी मंडळाच्या छोट्या मोठ्या उपक्रमांचे ४ आधारस्तंभ

  • असावेत हे त्यांच्या संस्थापकांनी ठरवले. ते चतुःस्तंभ म्हणजे - सण, संस्कृती,

संस्कार आणि समाज.

१. सण

सण हा प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळयाचा विषय आहे. मकरसंक्रांती सारखा घरगुती सण असो किंवा गणेशोत्सवासारखा सार्वजनिक, प्रत्येक सणामध्ये आपल्या घरापासून ते समाजापर्यंत असलेल्या साजरीकरणाचे स्वरूप जपणे हे प्रत्येक संवेदनशील मराठी मन विचार करीत असते. तर या विचाराला कृतीची जोड देणे हे या मंडळाचे महत्वाचे कार्य असेल.

त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सण, व्रतं, प्रथा इ. कालचक्राशी सुसंगत असतात. ते नेमके कसे, हे आपल्या पुढील पिढीला समजावून देणे हे देखील या कार्याचा भाग असेल. आजकाल प्रत्येक सणाचा इव्हेंट होणे हे आले पण तरीही ह्यातील मर्म लक्षात घेऊन ते जिवंत ठेवण्याची जबाबदारी हे मंडळ नित्य पार पाडतंय.

२. संस्कृती

संस्कृतीचा उल्लेख भाषेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर मराठी भाषेबद्दलची ओढ, तिच्या विविध कला, छटा याचे दर्शन हे मंडळाच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांतून जाणीवपूर्वक करणे यासाठी हे मंडळ सदैव कार्यरत राहील.

३. संस्कार

तिसरे सूत्र म्हणजे संस्कार आणि पहिल्या दोन सूत्रांच्या सुयोग्य अमलातून ते होईलच. त्याशि वाय आपल्या सर्व मराठी घराघरांत होणारे संस्कार हे जीवंत ठेऊन वारसा म्हणून पुढील पिढीला देणे हे सुद्धा मंडळाचे महत्वाचे कार्य असेल.

त्या अनुषंगाने संस्कार वर्ग किंवा वर सांगितलेल्या कार्यक्रमांत लहान मुलांचा सहभाग वाढवून या संस्करांची उजळणी ह्या पद्धतीने होत राहावी, असा मंडळाचा मानस आहे.

४. समाज

कुठल्याही परदेशात आपली भाषा, संस्कार व राहणीमान जपणे हि आजच्या काळातदेखील पराकाष्ठा नसतील तरीही अविरत प्रयत्न लागतात. इंग्लंडमध्ये आल्यावर विद्यार्थ्यांच्या, professionals च्या आणि कुटुंबांच्या वेगवेगळ्या समस्या असतात.

राहण्यासाठी सुरक्षित परिसर, पब्लिक transport ची सोय आणि नोकरीच्या ठिकाणी जाताना लागणार वेळ,

मुलांच्या शाळा, मराठी/भारतीय वस्तू, वाणसामानाची दुकाने इ. असे असंख्य प्रश्न सुरवातीच्या काही महिन्यांत किंवा काही बाबतीत वर्षभर नवख्या मंडळींना सतावतात.

तर अशा मंडळींना ब्रिटिश राहणीमान, वातावरण,कायदेव्यवस्था, visa system इ. ची माहिती व साधने उपलब्ध करून देणे हे मंडळाचेप्रमुख कार्य राहील. उदा. इंग्लंडच्या हवामानाशी जुळवून घेणेहाच खरा चर्चेचा आणि कसरतीचा विषय आहे.

तर ह्या चतुःसूत्री वर आधारि त मंडळाचा पहि ला कार्यक्रम म्हणून मकरसंक्रांत आणि हळदी कुंकू समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला २५ महिलांनी हजेरी लावली होती.

त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या मुलांना आणि त्यांना या सणाचे महत्व सांगणारी एक मनोरंजक नाटिका सादर केली गेली (ही नाटिका मंडळाच्या YouTube चॅनेल वर उपलब्ध आहे). कार्यक्रमाला आलेल्या सर्व महि लांना पारंपारिक वाण, तिळगळु व हळदी कुंकू करून हा समारंभ संपन्न झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT