What is the Real Name of Gatari Amavasya sakal
संस्कृती

Gatari Amavasya 2025: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

Gatari Amavasya 2025 date and significance: गटारी म्हणजे केवळ खाणं-पिणं नाही, तर त्यामागे आषाढ अमावस्येचा आध्यात्मिक अर्थ आहे.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. गटारी अमावस्या दरवर्षी श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते.

  2. या दिवशी भरपूर प्रमाणात मांसाहार आणि मद्यपान केले जाते.

  3. पण आषाढी अमावस्येचं मूळ नाव 'गटारी' नाही हे तुम्हाला माहित आहे का?

श्रावण सुरु होण्यापूर्वी सगळ्यांच्या खासकरून नॉनव्हेजप्रेमींच्या आवडीचा सण म्हणेज गटारी अमावस्या. या दिवशी बहुतांश लोकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. पण खूप कमी जणांना माहित आहे की गटारी अमावस्येचं मूळ नाव गटारी नाही, तर गतहारी अमावस्या आहे. चला तर मग जाणून घेऊया आषाढ अमावस्येला हे नाव कसं पडलं.

गटारी अमावस्या

गटारी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर मजा, मस्ती, भरपूर मांसाहार आणि मद्यपानाचं चित्र उभं राहतं. मात्र गटारीचा अर्थ केवळ इतकाच आहे का? आणि 'गटारी' या शब्दाचा 'गटार' या शब्दाशी काही संबंध आहे का, याची माहिती अनेकांना नसते.

गटारी नव्हे, 'गतहारी'

आपण ज्याला आज "गटारी अमावस्या" म्हणतो, तिचं मूळ नाव "गतहारी अमावस्या" असं आहे. 'गतहारी' हा शब्द 'गत' म्हणजे गेलेला आणि 'आहार' या शब्दांचं मिश्रण आहे ज्याचा अर्थ "त्यागलेला आहार". कालांतराने ‘गतहारी’ हा शब्द बदलत-बदलत ‘गटारी अमावस्या’ असा अपभ्रंशित रूपात प्रचलित झाला.

यंदा गटारी अमावस्या कधी आहे?

महाराष्ट्रात 2025 मध्ये श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे यावर्षी गटारी अमावस्या 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

का साजरी केली जाते गटारी?

श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो आणि या काळात पचनशक्ती कमी होत असल्यामुळे हलक्या अन्नाला अधिक प्राधान्य दिलं जातं. यामुळे मांसाहार आणि मद्यपान यासारख्या गोष्टी टाळण्याचं महत्त्व वाढतं. त्यामुळेच गटारी अमावस्येच्या दिवशी लोक जड अन्नाचे म्हणजेच मांसाहाराचे सेवव करून पुढील काळात संयम पाळतात.

FAQs

  1. गटारी अमावस्येचा खरा अर्थ काय आहे? (What is the real meaning of Gatari Amavasya?)
    → गटारी अमावस्येचं मूळ नाव ‘गतहारी अमावस्या’ आहे, ज्याचा अर्थ आहे “त्यागलेला आहार”. श्रावणात जे पदार्थ वर्ज्य असतात, त्यांचा त्याग करण्याआधीचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

  2. या दिवशी मांसाहार आणि मद्यपान का केलं जातं? (Why is non-vegetarian food consumed on Gatari Amavasya?)
    → श्रावण महिन्यात मांसाहार व मद्यपान वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे त्याआधी लोक आवडते पदार्थ खाऊन संयमित जीवनासाठी स्वतःला तयार करतात.

  3. ‘गटारी’ आणि ‘गटार’ या शब्दांचा काही संबंध आहे का? (Is there any connection between the words 'Gatari' and 'Gutter'?)
    → नाही, ‘गटारी’ हा शब्द ‘गतहारी’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे आणि त्याचा ‘गटार’ या शब्दाशी काहीही संबंध नाही.

  4. 2025 मध्ये गटारी अमावस्या कधी आहे? (When will Gatari Amavasya be celebrated in 2025?)
    → 2025 मध्ये गटारी अमावस्या 24 जुलै रोजी साजरी केली जाईल, कारण श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

Panvel News: मोलाचा जीव संकटात! कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना नोटिसा, अग्निशमन यंत्रणा बंद; नेमकं प्रकरण काय?

Turntable Ladder : ‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय? कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाची शौर्यपूर्ण मोहीम

Latest Marathi News Live Update : फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

Bangladesh Anti-India Rally : बांग्लादेशात कट्टरपंथियांकडून भारतविरोधी रॅली, प्रसिद्ध हिंदू मंदिरावर बंदी घालण्याची मागणी

SCROLL FOR NEXT