gudi padawa sakal
संस्कृती

Gudi Padwa: गुढीपाडवा फक्त सण नाही, तर विजयाचं प्रतीक आहे

विजयाचे स्वागत करणारा दिवस म्हणजे 'गुढीपाडवा' होय.

सकाळ डिजिटल टीम

पर्यावरणाची नातं जोडायला लावणारा ज्याची सुरवात चैत्राच्या चांदण्यातून होत असते, हिरवी कोवळी पालवी आपली डोकी डोकावून येताना नवी धुमारे फोडणारा दिवस म्हणजे ''गुढीपाडवा''. निसर्गाला बंधू म्हणून स्वागत करणारी आपली संस्कृती. विजयाचे स्वागत करणारा दिवस म्हणजे ''गुढीपाडवा'' होय. साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त मानला जाणारा हा एक मुहूर्त होय. (Gudi Padwa is not just a festival, it is a symbol of victory)

आले आले चैत्रातले नववर्ष

मनात मावेनासा झालाय हर्ष

करू यांना व उमेदीला स्पर्श

आनंदाने साजरे करूया हे नववर्ष

या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी गुढी उभी केली जाते. काठीला स्वच्छ अंघोळ घालून हळदी-कुंकू, चंदनाने सजवले जाते, तेजोमय गुढीवर कोरी साडी परिधान केली जाते, फुलांची माळ, साखरेची गाठी ,कडुनिंबाची फांदी व तांब्याचा गडू लावून डौलदार नाजूक सजलेली गुढी सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत उभारली जाते. ही एक विजयाचे प्रतीक आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या अस्मितेतील एक प्रतीक आहे. तिच्या उभारण्यामागे इतिहास आहे. एक जिवंत, धगधगत्या यज्ञकुंड यासारखे देशावरील प्रेम आहे.

असुरी शक्तीचा नाश करणे याचे गुढी सूचक आहे. ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वातंत्र्याचे अनमोल दान आपल्या पदरात टाकलं त्यांना आपण चौकटीत बंद करत आहोत. माणसाला माणसांपासून तोडण्याच्या स्टंटबाजीपेक्षा कणभर दानाची मनभर प्रसिद्धी करण्यापेक्षा हे सगळं बदलवण्याचा संदेश गुडी देते. म्हणून तर कडुलिंबाच्या पानात, मधात गूळ भिजवलेली, हरभरा डाळ घालून आपण प्रसाद पाडव्याला भक्षण करतो. याचा अर्थ कडू-गोड आयुष्याला प्रसाद बनवण्याची कला ज्याला साधते तोच यशाची गुढी उंच उभारू शकतो.

दहशतवाद, भ्रष्टाचार, बेरोजगारी यांवर मात करू या. स्त्रिया, गोरगरीब, पीडित यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न करूया. गुडी सारखं देखणं, उंच आभाळात राहण्याचं उंच स्वप्न सारेच जण पाहतो, सांजवेळेला गुढी उतरते तेव्हा साखरेच्या माळा वाटून गोडवा देऊन जाते. गाठी सोडवत गेलं की गुंता सहज सुटतो. साखर गाठी हे याचं खास वैशिष्ट्य आहे. खऱ्या आयुष्यात असेच व्हायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: तुरुंगवास टळला… पण दोष माफ नाही! माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात हायकोर्टाचा असा निर्णय की राजकारण हादरलं

मोठी बातमी! आगामी भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार नाही एकही शिक्षक; ‘हे’ आहे कारण, डिसेंबरअखेर अंतिम होणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

SCROLL FOR NEXT