Hindu Religion
Hindu Religion esakal
संस्कृती

Hindu Religion : तुमचा आत्मा किती जूना आहे? तुमच्या राशींच्या या वैशिष्ट्यांनी ओळखा

धनश्री भावसार-बगाडे

Do You Have Old Soul : हिंदू धर्मात मानले जाते की, आत्मा हा अमर, अमर्त्य आहे. माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलत असतो. एका शरीराचं आयुष्य संपलं की त्याचा तो त्याग करतो, ज्याला आपण मृत्यू म्हणतो. तर पुन्हा दुसरे शरीर धारण करतो त्याला आपण जन्म म्हणतो.

त्यामुळे असे एक शरीर सोडून दुसरे धारण करणारा हा आत्मा नेमका किती जूना आहे हे कसे कळू शकते? त्याचं नेमकं उत्तर देणं कोणालाही शक्य नसले तरी त्याचा अंदाज मात्र बांधता येतो असं ज्योतिष्य तज्ज्ञांचं मत आहे.

तुमच्यातल्या काही उपजत सवयी, आवडी-निवडी यामुळे तुमचा आत्मा जूना आहे का, हे कळू शकते. याचे काही संकेत पुढील प्रमाणे -

  • तुम्ही चुकीच्या काळात जन्माला आल्यासारखं वाटतं का? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पिढीसोबत कधी आउट ऑफ स्टेप वाटतं का?

  • व्हायरल व्हिडिओंपेक्षा जुन्या पुस्तकांमध्ये तुम्ही अधिक रमतात, तुम्ही नैसर्गिकरित्या शहाणपण आणि परिपक्वतेकडे आकर्षित आहात का?

तुम्ही कदाचित एक 'जूना आत्मा' असाल, ही संज्ञा त्यांच्या वयाहून अधिक शहाणपण आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्यांसाठी तयार केली गेली आहे.

पण, तुमच्या राशीचा याच्याशी काही संबंध असू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? आज अशाच काही राशींची वैशिष्ट्ये बघणार आहोत जे Old Soul असल्याचे संकेत देतात.

1) मकर

  • मकर, तुमच्या मित्रांच्या गटात तुम्ही अनेकदा तर्कशुद्ध बोलतात, जे इतरांना अवाक करणारे असते.

  • बहुतेकदा तुम्ही एक व्यावहारिक आणि आधारभूत दृष्टीकोन व्यक्त करता जो 'Old Soul'चे वैशिष्ट्य आहे.

  • जणू काही तुम्ही इथे या आधीही आला आहात, आणि हा संसाराचा खेळ बऱ्याच काळापासून खेळत आहात असं तुम्हाला वाटतं.

  • तुमच्यात प्रचंड संयम आणि लवचिकता जाणवते. जेव्हा इतर सर्वजण पॅनीक मोडमध्ये असतात तेव्हा तुम्ही शांत राहिलेले ते क्षण लक्षात ठेवा? हीच 'Old Soul'ची खूण आहे.

  • ट्रेंडपेक्षा परंपरेला तुमची पसंती असते. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा उठाव मिळतो.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मकर, तुमचा जीवनाकडे बघण्याचा एक परिपक्व दृष्टीकोन आहे जो तुमच्या वयाच्या पलीकडे असलेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून दिसतो.

ही सगळी लक्षणं तुमच्यातही दिसत असतील तर तुम्ही एक Old Soul आहात.

2) मीन

  • तुमचा सखोल अंतर्ज्ञानी आणि भावनिक स्वभाव तुम्हाला कधीकधी या सगळ्यापासून वेगळे, आउटसाइडर असल्यासारखे वाटू शकते.

  • जीवन आणि त्यातील चढ-उतारांबद्दलची तुमची सखोल समज ही अशी गोष्ट आहे जी अनेकांना समजून घेण्यासाठी आयुष्यभर लागतो.

  • जेव्हा लोकांना सल्ल्याची आवश्यकता असते तेव्हा लोक ज्या व्यक्तीकडे वळतात त्या व्यक्ती तुम्ही आहात, हे तुमच्या लक्षात आले आहे का?

  • तुमच्याकडे सहानुभूती दाखवण्याची आणि अंतर्दृष्टी प्रदान करण्याची अद्वितीय क्षमता आहे जी तुमच्या वयाहून अधिक आहे. हे जवळजवळ असे आहे की तुम्ही स्वतः त्यांच्या परिस्थितीतून गेला आहात असे जाणवते.

  • शिवाय, अध्यात्माकडे तुमचा कल आणि आधिभौतिक जग तुम्हाला वेगळे करते. यातून तुमची वैश्विक आणि भावपूर्ण समज जाणवते. ज्याची इतर जण फक्त इच्छा करू शकतात.

  • शिवाय, तुम्हाला सिवतःला रिचार्ज करण्यासाठी एकटेपणा हवा असतो. त्यात तुम्ही अधिक रमतात. ही संवेदनशीलता आणि खोली ‘Old Soul’चे ट्रेडमार्क आहेत.

3) वृश्चिक

  • वृश्चिकांमध्ये अनेकदा भावनिक खोली आणि तीव्रता असते जी वृद्ध ऋषीच्या आत्म्याला सूचित करते.

  • तुमच्या भावनिकतेची तीव्रता आणि खोली यामुळे तुम्ही अनेकदा या पृथ्वीवर आले आहात, इथे जगले आहात, बरच काही शिकले आहात असं जाणवतं.

  • तुम्हाला काही जाणिवा होतात, इंट्युएशन्स असतात. मात्र त्यावेळी इतर जण त्यापासून अनभिज्ञ असतात.

  • तुमचे हे इंट्युएशन्स तुम्हाला परिस्थिती आणि लोक समजून घेण्यासाठी फार मदत करतात.

  • तसेच, जीवनाचे रहस्ये उलगडण्याची तुमची आवड हे तुम्ही ‘Old Soul’ असल्याचं आणखी एक लक्षण आहे.

  • तुमचा गूढ आणि प्रखर स्वभाव आधुनिक जगात राहणाऱ्या ‘Old Soul’ चिन्ह आहे.

4) वृषभ

  • स्थिरता आणि विश्वासार्हता परिपक्व आत्मा असल्याचं दर्शवते. जेव्हा लोक डळमळीत होतात तेव्हा ते तुमच्याकडे आधार म्हणून बघतात.

  • जीवनातील तुमचा संयम आणि व्यावहारिकता तुमच्या सभोवतालच्या लोकांना आश्चर्यचकित करते.

  • जणू काही तुम्ही याआधी अगणित अनुभव घेतलेले असतात. तुम्हाला शांततेने आणि कृपेने जीवनातील अडथळ्यांना सोडवण्यास सक्षम करते.

  • तुम्ही जीवनाकडे फार प्रगल्भ दृष्टीने बघतात.

  • तुम्ही मटेरिअॅस्टीक आयुष्य जगत नाहीत, तर प्रेमाला जास्त महत्व देतात.

  • हे आनंद आणि व्यावहारिकता यांच्यातील संतुलनाची प्राचीन समज दर्शवते.

  • तुमचे शहाणपण, स्थिरता आणि जीवनातील साध्या सुखांबद्दलचे प्रेम तुम्हाला खरा 'Old Soul' म्हणून दर्शवते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT