हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नान करणे सोबतच दीपदान करण्याची विशेष प्रथा आहे. खरं तर या प्रथेलाही विशेष महत्त्व आहे. आज आपण कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि स्नान का करतात आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. (importance of nadi snan and deep daan on kartik purnima)
कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि नदीत स्नान का करतात?
कार्तिक पोर्णिमेला देव यमुना तटावर स्नान करुन दिवाळी साजरी करतात, अशी मान्यता आहे. खरं तर कार्तिक महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची विशेष परंपरा आहे. विशेषत: पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते.
दिवाळीच्या दिवशी सर्व देवता गंगा नदीच्या घाटावर दिवा लावून आपला आनंद व्यक्त करतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच दिव्याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कार्तिक महिन्यात दीपदानला विशेष महत्त्व आहे.
कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि नदीत स्नान केल्याने खालील फायदे होतात?
कार्तिक पौर्णिमेला दीपदान आणि नदीत स्नान केल्याने सर्व मनोकामना पुर्ण होतात. हाती घेतलेले काम मार्गी लागतात.
दीपदान केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. पैशांची समस्या दूर होते आणि धनसंपत्तीत वाढ होते.
असं म्हणतात की कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी त्रिपुरोत्सव करत - 'कीटाः पतंगा मशकाश्च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवाः, दृष्ट्वा प्रदीपं नहि जन्मभागिनस्ते मुक्तरूपा हि भवति तत्र' म्हणत दीपदान केल्याने पुनर्जन्माचा कधीच त्रास होत नाही.
या दिवशी दीपदान आणि नदीत स्नान केल्याने संकटापासून सुटका होते. यम, शनी, राहु आणि केतु यांच्या वाईट प्रभावाने जातक भयमुक्त राहतात. जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात.
कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण
कार्तिक पौर्णिमेलाआज चंद्रग्रहणही आहे. त्यामुळे स्नान, दान कसं करायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. आज संध्याकाळी 05.32 पासून चंद्रग्रहण सुरू होणार ग्रहणाचा सुतक काल सकाळी 9.21 पासून सुरू होणार. अशात चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी तुम्ही स्नान आणि दान करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.