Kaal Sarp Yog esakal
संस्कृती

Kaal Sarp Yog : कुंडलीत कालसर्प योग आहे? घाबरू नका, या उपायांनी सगळं होईल नीट

जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये असतात तेव्हा कालसर्प योग तयार होतो. मात्र यावर उपायसुद्धा आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Kaal Sarp Yog : कालसर्प योग हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. कालसर्प योगाच्या नावाने अनेकजण घाबरतात परंतु याबद्दल घाबरण्याची किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. असं म्हणतात की आपल्याला या जन्मी येणाऱ्या यातना या मागल्या जन्मातील कर्माचे भोग असतात. मात्र प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच.

जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये असतात तेव्हा कालसर्प योग तयार होतो. मात्र यावर उपायसुद्धा आहे. उपायाबाबत जाणून घेऊया सविस्तर.

असे मानले जाते की श्रावण महिन्यात सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात. भोलेनाथ देखील यावेळी पृथ्यीवर येतात. 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. यावेळी प्रत्येकाला शिवाला प्रसन्न करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याचे सांगितले जाते. ज्यावेळी कुंडलीत नागाची नाराजी असते तेव्हा भगवान शंकराची पूजा करणे महत्त्वाचे असते.

श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करून नागराजही प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. भोलेनाथ प्रसन्न झाल्यावर नाग देवतेचा रागही आपोआप संपतो. काल सर्प दोष निवारणासाठी श्रावण महिना हा सर्वात योग्य काळ मानला जातो. या महिन्यात महामृत्युंजय किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. (Astrology)

या संपूर्ण काळात भोलेनाथाला अभिषेक करूनही नागराज प्रसन्न होतात. रुद्राक्षाच्या जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा 1 लाख 32 हजार वेळा जप करावा. नित्य दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने शिव शंकरही प्रसन्न होतात. शिवलिंगावर दूध, गंगाजल आणि मध यांचा अभिषेक केल्यानंतर बिल्वाचे पान अर्पण केल्याने काल सर्प योग शांत होतो. (Lord Shiva)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT