Ganesh Visarjan 2023 esakal
संस्कृती

Ganesh Visarjan 2023 : प्रत्येक मराठी माणसाला ताल धरायला लावणारा ढोलताशा आला कसा माहितीये?

ढोलताशा पथकांनी तरुणांमध्ये शिस्त आणली असं अप्पासाहेब पेंडसे यांचं म्हणणं होतं.

धनश्री भावसार-बगाडे

Dhol Tasha Pathak History In Maharashtra : मंगल कार्य असो, उत्सव असो की सणसमारंभ महाराष्ट्रात ढोल ताशा वाजला नाही तर तो साजरा झाला असं वाटतंच नाही. मांगल्याचं प्रतिक असणारे हे ढोल ताशा वादन प्रत्येक ऐकणाऱ्याचे पाय थिरकायला लावले नाही तर नवलंच. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सगळीकडे ढोल ताशांचा गरज दिसून येतो.

पण तुम्हाला माहितीये का या ढोल ताशांचं प्रस्थ एवढं वाढलं कसं? याचा इतिहास काय आहे? चला तर मग जाणून घेऊया.

पुरातन काळाशी नाते सांगणाऱ्या ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनातून एका अर्थाने आपली सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. अशा पथकांचे श्री गणेशापुढील लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणे ही जणू पर्वणीच. १८९४ मध्ये निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत १२० गणपती होते.

लेझीम, घुंगरू, चौघडे अशा मंगलमय सूरांमध्ये गणपतींचे विसर्जन झाले. १९०९ च्या मिरवणुकीत मेळ्यांचा सहभाग हे मोठे आकर्षण होते. मेळ्यांची पदे ऐकण्यात आणि कवायत पाहण्यास मिरवणूक मार्गात गर्दी होत असे. बरीच वर्षे बंद पडलेली लेझीम खेळण्याची प्रथाही १९०९ मध्ये सुरू झाली. 

अप्पासाहेब स्वतः उतरले रस्त्यावर

१९६५ च्या उत्सवाला युद्ध आणि दंगलींनी ग्रासले होते. त्या वर्षी मात्र मिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी होती. पोलीसांच्या या निर्णयाला अप्पासाहेब पेंडसे म्हणजेच डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी आव्हान देण्याचं ठरवलं. निषेध म्हणून त्यांनी थेट गळ्यात ताशा घेऊन लक्ष्मी रोडच्या चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ताशा वाजवू लागले.

ढोलताशा प्रत्यक्षात १९६०मध्ये

लोकमान्य टिळकांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शकताच्या पूर्वार्धात या उत्सवाला सार्वजनिक स्वरुपात पुढे आणले. पण ढोलताशा परंपरा प्रत्यक्षात १९६० च्या जवळपास अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरुवात केली. त्यांनी ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोलताशा पथकाला सुरुवात केली.

ढोल ताशा पथक हे तरुणांना शिस्त लावण्याचे माध्यम आहे असे अप्पासाहेबांना वाटायचे. अप्पासाहेबांनी वादकांसाठी पसंत केलेले नृत्य तांडवातून प्रेरीत होते. यातून तरुणांमधून नेतेही तयार होतात.

ढोल ताशाला आधी आदराचे स्थान नव्हते

सुरुवातीला ढोल-ताशा वादनाला आदराचे स्थान नव्हते. लोकांकडून विरोध व्हायचा पण आप्पासाहेबांनी हे सिद्ध केले की ढोलताशा वादन संरचित आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले जाऊ शकते आणि आकर्षक संगीत आणि नृत्य असू शकते, तेव्हा या परंपरेला मान्यता मिळू लागली. लोकं ठराविक गट करून हे वादन शिकत आणि मिरवणुकीत सादरीकरण करत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT