Nagpur ashadhi wari pandharpur varkari panth tradition Kirtan bhajan
Nagpur ashadhi wari pandharpur varkari panth tradition Kirtan bhajan 
संस्कृती

समाजप्रबोधनासाठी आषाढी वारीचे निमित्त

केतन पळसकर

नागपूर :

व्हा व्यसनमुक्त । टाळा दुर्व्यवहार।

बना रे खंबीर । गावासाठी..।।

या तुम्ही एकत्र । मिटवा भांडण ।

करावे कांडण । विकाराचे..।।

गावावरून देशाची परीक्षा असते. गाव समृद्ध तर देश समृद्ध, या धारणेनूसार गावातील तरुणांना व्यसनमुक्त होण्याचा संदेश अभंगातून बंडोपंत बोढेकर देत आहे. वारकरी संप्रदायामध्ये समाज प्रबोधनपर विचारांचा वारसा राज्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराजाच्या विदर्भनगरीला लाभला आहे. यंदाच्या वारी निमित्ताने नागपूरकर वारकरी हाच वारसा पुढे नेत समाजप्रबोधन करीत आहेत.

लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज पायदळ प्रवास करणारे वारकरी सायंकाळ झाल्यानंतर नियोजित स्थळी विसावा घेतात. या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन आदीचा घाट घातला जातो. यात प्रामुख्याने अशोक महाराज देवतळे यांच्या दिंडीतील ह. भ. प. गु उल्हास महाराज सूर्यवंशी, ह. भ. प. गु माधव महाराज चावके, ह. भ. प. कृणाल महाराज फुलझेले यांचा समावेश आहे. समाजामध्ये प्रबोधनाची कोणतीही प्रसारमाध्यमे उपलब्ध नव्हती तेव्हा संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे मोठे काम केले.

ही परंपरा नागपूरकर वारकऱ्यांनी पुढे नेली आहे. समाजाने आधुनिकतेची कास धरलेली असली तरीही संतांनी दिलेल्या परंपरेत आजही वारकरी संप्रदाय संत विचारांद्वारे समाज प्रबोधनाचे मोठे काम करताना दिसत आहेत. नागपूर येथून थेट पंढरपूरला पायदळ जाणाऱ्या ह. भ. प. गोविंद महाराज कन्हेरकर वारकरी दिंडीतील वारकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच, बोरकर व लांजेवार महाराज, वासुदेव महाराज टापरे, परसराम कळंबे महाराज यांच्या दिंडीनेसुद्धा या कार्यात स्वत:ला वाहून नेत संतांचे उपदेश आचरणात आणले आहे.

गाडगे महाराज, तुकडोजींचा वारसा

विदर्भामध्ये समाज प्रबोधनाची मोठी परंपरा. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अनेकांचे आदर्श. त्यांच्या विचारांना पुढे नेत नागपूरकर वारकऱ्यांकडून प्रामुख्याने व्यसनमुक्ती, जातीभेद यासह पर्यावरण रक्षण, बेटी बचाव, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयांवर वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT