Taljai Devi Sakal
संस्कृती

तळजाई

पुण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हिरवीगार वनराई पाहून मन मोहवून गेले. टेकडीवरील झाडे आणि प्रशस्त रस्ता यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरात पोहोचलो.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील कात्रज व धनकवडी गावांविषयी ऐकले होते. पण, तिथे जाण्याचा योग कधी आला नव्हता. पण, त्या दिवशी कात्रज उद्यान बघायला जायचा आग्रह कुटुंबातून झाला आणि घराबाहेर पडलो. कात्रजचा तलाव, प्राणी संग्रहालय, पांढरा वाघ, नीलगाय, हरिण, हत्ती बघायला मिळाले. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले बघायला मिळाली. वेगवेगळ्या पक्ष्यांचे मंजूळ स्वर कानी पडले. उद्यानात फेरफटका मारण्यासाठी असलेल्या ई-कार होत्या. ना आवाज, ना धूर. त्यामुळे ना ध्वनी प्रदूषण, ना वायू प्रदूषण. पर्यावरणपूरक वाहन काय असते? याची प्रचिती आली. दोन-अडीच तास उद्यानात भटकंती केल्यानंतर तळजाई टेकडीवरील तळजाई देवीच्या दर्शनासाठी निघालो. धनकवडीतून पुढे गेल्यावर अरुंद रस्त्याने टेकडीवर पोहोचलो.

पुण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात हिरवीगार वनराई पाहून मन मोहवून गेले. टेकडीवरील झाडे आणि प्रशस्त रस्ता यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरात पोहोचलो. दर्शनासाठी गेलो. छोटेसे पण सुरेख मंदिर. खेळती हवा. मंदिरात तीन देवींच्या मूर्ती होत्या. त्या स्वयंभू रूपातील देवींच्या मूर्ती असल्याची माहिती मिळाली. देवींची नावे पद्मावती, तळजाई व तुळजाभवानी. मंदिराच्या पुढील बाजूस मारुतीचे मंदिर आहे. मागेही तीन छोटी मंदिरे आहेत. थोडा वेळ मंदिराच्या परिसरात बसलो. चोहोबाजूने गजबजलेल्या पुण्यात इतके शांत ठिकाण पहिल्यांदाच बघत होतो. असेच एक शांत ठिकाण यापूर्वी पाहिले होते. ते म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीजवळील दुर्गादेवी टेकडी. आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने या टेकडीचा विकास केला आहे. तळजाई टेकडी पाहून दुर्गादेवी टेकडीची आठवण झाली. शांत परिसरामुळे मन प्रसन्न झाले. निसर्गाचा आनंद घेता आला. हा परिसर तळजाई पठार म्हणूनही ओळखला जातो. देवीची प्रसन्न मूर्ती मनाला उभारी देऊन गेली. या परिसरात अनेकजण फिरायला, व्यायामासाठी येतात, असे एका तरुणाने सांगितले. तो म्हणाला, ‘तळजाई देवीचे मंदिर ऐतिहासिक आहे.

जवळपास साडेतीनशे-चारशे वर्षांचा इतिहास आहे. या बाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात.’ तो सांगू लागला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करायचा होता. त्याची तयारी रायगडावर सुरू होती. महाराजांना कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानीचा आशीर्वाद हवा होता. त्यासाठी देवीचे पालखी रायगडाकडे निघाली होती. जिजाऊ मॉं साहेबांना पालखीचे दर्शन घ्यायचे होते. त्यासाठी पालखी पुण्याजवळ थांबवण्यात आली. ते ठिकाण म्हणजेच हे तळजाई पठार.’ माझ्या ज्ञानात भर पडली होती. इतके वर्ष पुण्यानजिकच्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत राहात असूनही तळजाई देवी, तळजाई पठाराबाबत माहिती नव्हती. त्याबाबतची आणखी एक आख्यायिका त्या तरुणाने सांगितली. तो म्हणाला, तळजाई मंदिराबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे पूर्वी राव बहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. त्यांना देवीने दृष्टांत दिला.

मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्योदयापूर्वीच तयार झाले पाहिजे, नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. त्यानुसार ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरुपातील पद्मावती, तळजाई माता आणि तुळजाभवानी यांच्या मूर्ती आढळल्या. या मूर्ती पठारावरील तळ्यात मिळाल्या होत्या. त्यामुळे या देवीला तळजाई असे म्हणतात आणि या भागाला तळजाई पठार नावाने ओळखले जाते. पण, आसन वेळेत न मिळाल्याने देवीने जमिनीवरच ठाण मांडले.’ कालांतराने या भागाचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप बांधण्यात आला. प्रवेशद्वाराशी पडवी, मारुती मंदिर आणि तळजाई, पद्‌‌मावती, तुळजाभवानी यांचे घुमटाकार मंदिर बांधले. नवरात्रामध्ये मंदिरात मोठा उत्सव असतो. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणचे भाविक दर्शनासाठी येतात. त्या तरुणाने आणखी माहिती पुरवली. माहितीचा खजिना मनात साठवून उत्तरेकडील रस्त्याने पठारावरून खाली उतरू लागलो. सहकारनगरच्या दिशेने खाली उतरून घराकडे निघालो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT