foreign visitors ashadi wari 2023 wari warkari culture palkhi
foreign visitors ashadi wari 2023 wari warkari culture palkhi sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : पंढरीच्या वारीची परदेशी वारकऱ्यांना भुरळ

शंकर टेमघरे

वेळापूर : ‘‘ज्ञानोबा-तुकाराम नामात काही तरी जादू आहे, लाखो वारकरी एकात्मभावाचे तत्त्व जगतात, जीवनाच्या आत्मिक परिपूर्ततेसाठी वारी करणे गरजेचे वाटते,’’ हे शब्द आहेत पहिल्या वर्षी वारीत केवळ साडेआठ किलोमीटर पायी चाललेल्या परदेशी वारकऱ्याचे. नॉर्वेतून आलेल्या या वारकऱ्यांचे नाव आहे, ‘आसंमंड आमास’. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरणाची प्रचिती आणणारे हो उदाहरण आहे.

पंढरीच्या वारीत निष्ठावान वारकऱ्यांसमवेत सर्वच क्षेत्रातील वारकरी चालतात. जो तो आपापल्या पद्धतीने वारी जगतो, त्यातून अपेक्षित अर्थ आपल्या जीवनाला लागतो. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या वारीने प्रांतीय भिंती कधीच तोडल्या.

मात्र, गेल्या काही वर्षात परदेशी वारकऱ्यांची संख्याही वाढत आहेत. काहीजण जाणीवपूर्वक अभ्यासासाठी येत आहेत. तर काहीजण तिकडेच वारकरी संप्रदायाची महती वाचनातून, शिक्षणातून शिकून वारीत प्रात्याक्षिकांसाठी येतात आणि वारीमय होऊन जातात.

हे परदेशी वारकरी वारीमय होऊन गेले आहेत. ती संख्या जरी बोटावर मोजण्याइतकी असली तरी त्यांची आध्यात्मिक प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे, असाच एक पहिल्या वर्षी वारीत सहभागी झालेला वारकरी भेटला. त्याच्याशी बोलताना कळाले की तो नॉर्वे या देशातील रहिवासी होता.

साउथ एस्टर्न नॉर्वे विद्यापीठात प्राध्यापक पदावर कार्यरत असणारे आसंमंड आमास हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका प्रकल्पावर काम करत आहेत. ते वर्षातून एकदा तरी भारतात येऊन त्यांच्या प्रकल्पाविषयी संशोधन करीत होते.

मात्र, यावेळी ते आषाढी वारीत आले. आज पहिल्या दिवशी त्यांनी माळशिरस ते वेळापूर या वाटचालीतील साडेआठ किलोमीटर अंतर पायी पार केले. त्यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

वारीविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘‘इतक्या मोठ्या संख्येने वारकरी चालतात, भजन म्हणतात, हाताने टाळ वाजवून भक्तीचा आनंद घेतात, हे मी आज प्रथमच पाहिले. हा वारीतला अनुभव माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. यापूर्वी मी कधीही असे पाहिले नव्हते.

इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात आणि सर्व एकोप्याने राहतात, हेच विशेष आहे. वारकरी हे एकात्मभावनेने वारीत आले आहेत. हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे. प्रत्येकजण एक असल्यासारखेच वागतात.

सगळे ग्रुपने लयबद्धपणे चालतात माझ्यासाठी इंटरेस्टिंग आणि खास असा हा अनुभव आहे. मी वारीचे छायाचित्र पाहिले होते. मला याबाबत अधिक उत्सुकता होती.त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. सुरेश गोसावी यांच्यासह वारीत सहभागी झालो.वारीत चालल्यावर एक सांस्कृतिक अनुभव मला शिकायला मिळाला, असेही ते म्हणाले.

माझ्यासाठी वारी हा मोठा आनंदोत्सव आहे. वारी हे एक कुटुंब आहे. त्या सर्वांची एकच भावना आहे. मी ज्ञानोबा-तुकाराम गजर केला. चाललो, खेळलो. मी पुढील वर्षीही पुन्हा वारीत सहभागी होईल. मी पहिल्यांदाच वारीत सहभागी झालेलो असल्याने मला जास्त काही माहिती नव्हते. वारकऱ्यांची एकात्म भावना मनात घर करून गेली.

ज्ञानोबा तुकाराम, हा आवाज काळजाला भिडणारा आहे. या दोन शब्दाविषयी मला जास्त काही माहिती नाही. परंतु, या दोन शब्दांनी माझ्यावर जादू केली आहे. हा अनुभव माझ्यासाठी समृद्ध करणारा असून ओढ निर्माण करणारा आहे असे आसंमंड आमास यांनी सांगितले.

आनंद वेगळाच

आसंमंड आमास म्हणाले की, हे लोक परंपरेचा मनमुराद आनंद घेताना आणि मोठा आनंदोत्सव साजरा करताना दिसतात. यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांकडून वारकऱ्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालताना कळत नसले तरी मी त्यांच्या आनंदात सहभागी झालो होतो.

मनाला सुखावणारे होते हे सर्व! मी वारकऱ्यांसोबत तल्लीन झालो होतो. एकवेळ मलाही प्रश्न पडत होता की, मी हे का करतोय? पण मला यातून आनंद मिळत होता आणि त्यापुढे सर्वकाही तोकडे होते. वारीचा भाग होता आले याचा आनंद काही वेगळाच आहे. भविष्यात मी संपूर्ण वारी परंपरा जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT