Parshuram Jayanti 2023
Parshuram Jayanti 2023 esakal
संस्कृती

Parshuram Jayanti 2023 : आज परशुराम जयंती, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

सकाळ डिजिटल टीम

Parshuram Jayanti 2023 : आज म्हणजेच २२ एप्रिलला परशुराम जयंती आहे. या दिवशी विष्णूच्या सहाव्या अवताराची पूजा केली जाते. या दिवशी काही श्लोकांचे पठण केल्याने मनशांती मिळते तसेच भगवंताच्या नावाचे उच्चारण झाल्याने त्यांची कृपाही तुमच्यावर असते. चला तर जाणून घेऊया पूजा विधी आणि मुहूर्त.

भगवान परशुरामाने ब्राम्हण ऋषींवर होणाऱ्या अन्यायाचा अंत केला होता. या दिवशी तुम्हाला भगवान परशुरामासह विष्णुजींची कृपा प्राप्त होते. तेव्हा जाणून घ्या परशुराम जयंतीला पूजेची विधी

अशी करा पूजा

या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्या.

त्यानंतर स्वच्छ कपडे घालून गंगाजलने तुमचे मंदिर शुद्ध करून घ्या.

त्यानंतर मंदिराच्या घरात धुतलेले कापड टाकून भगवान परशुराम आणि विष्णूंच्या मूर्तीचीय स्थापना करा.

देवाला फूल, तांदूळ आणि अन्य गोष्टी चढवा.

त्यानंतर देवाजवळ धूप, दिवा आणि अगरबत्ती लावा व पूजा करा.

तिथी

परशुराम जयंतींच्या तिथी मुहूर्ताला आज सकाळी ७.४९ मिनिटांनी सुरुवात होईल व हा मुहूर्त २३ एप्रिल सकाळी ७.४७ मिनिटांनी समाप्त होईल.

धार्मिक ग्रंथानुसार परशुरामांना काम जामदग्नाय, राम भार्गव आणि वीरराम असेही म्हटले जाते. हिंदू आस्थेनुसार आजही भगवान परशुराम यांचा पृथ्वीवर जीवंत वास आहे असे म्हटले जाते. दक्षिण भारतात उडुप्पीजवळ पजका च्या पवित्र स्थानी एक मोठं मंदिर आहे जेथे परशुरामांचं स्मरण केलं जातं. भारताच्या पश्चिम घाटावर अनेक अशी मंदिरं आहेत जी भगवान परशुरामांना समर्पित आहेत. (Muhurta)

या श्लोकांचं पठण करा

अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।

कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥

सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।

जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।

पुराणात ८ महापुरुषांचं वर्णन आहे ज्यांना अजरामर अशी मान्यता आहे. यात हनुमानजी, अश्वत्थामा, कृपाचार्य, भगवान परशुराम, ऋषि मार्कण्डेय, राजा बलि, महर्षि वेदव्यास आणि विभीषण यांची नावे आहेत. (Astrology)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT