Akshaya Tritiya 2023 : शीतलता प्रदान करणारा ‘वाळा', अक्षय्य तृतीयेला धार्मिकतेबरोबरच आरोग्यविषयक महत्व

र्मिकतेबरोबरच आरोग्यविषयक बाबींसाठी वाळा या बहुमूल्य वनस्पतीचा हमखास वापर करण्यात येतो, असे आयुर्वेदातज्ज्ञ सांगतात
Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023esakal

Akshaya Tritiya 2023 : हिंदुंचा अक्षय्य तृतीया हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पितरांच्या शांतीसाठी पूजेतून पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा हा त्यामागचा हेतू. या सणाला पूजा करतेवेळी माठाच्या पाण्यात वाळा(खस) घालण्याची प्रथा आहे. धार्मिकतेबरोबरच आरोग्यविषयक बाबींसाठी वाळा या बहुमूल्य वनस्पतीचा हमखास वापर करण्यात येतो, असे आयुर्वेदातज्ज्ञ सांगतात.

गवतासारखा दिसणारा वाळा हा पित व कफनाशक आहे. दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळ्याचे चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळ्याचे सरबत उत्तम असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.

वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला मोठी मागणी आहे. या सुगंधी तेलाचा वापर अत्तर, सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलाबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याच्या मुळांचा वापर चटया, पंखे, टोप्या बनविण्यासाठी करतात.

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या आधीच घराबाहेर काढा 'या' गोष्टी, नाहीतर...

जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताच्या बांधावर, उताराला वाळा (खस) गवताची लागवड केली जाते. त्यामुळे

वाळा या बहुउपयोगी वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. (Akshaya Tritiya)

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नसाल तर या वस्तू घरी आणा, धनाने भरेल तिजोरी

हे आहेत गुणधर्म

वाळ्यामध्ये शीतलता हा प्रमुख गुणधर्म आहेत.

थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे.

उन्हाळी लागल्यास त्याचे चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. (Health)

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. तसेच वाळ्याचे तेल अत्तरे, सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. बाजारात वाळ्याचे उशीरासव, पंडगोदक, उशीरादि चूर्ण मिळतात. वाळ्यात राळ, रंगद्रव्ये, आयर्न ऑक्साईड, आम्ल चुन्याचे प्रमाण असते चे शरीरासाठी पोषक ठरते.

- डॉ. मोना नायडू, आयुर्वेदतज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com