Peepal Puja vidhi Esakal
संस्कृती

Peepal Puja: कधी करावी पिंपळाची पुजा..घ्या जाणून

हिंदू धर्मामध्ये Hindu Religion पिंपळाचं स्थान पूजनिय आहे. पिंपळाचं झाडं हे अत्यंत पवित्र आणि मंगलदायी मानलं जातं

Kirti Wadkar

Peepal Puja: हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं स्थान पूजनिय आहे. पिंपळाचं झाडं हे अत्यंत पवित्र आणि मंगलदायी मानलं जातं. पौराणिक कथेनुसार पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंच वास्तव्य आहे तर खोडात केशव, फांद्यामध्ये नारायण, पानांमध्ये हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचं वास्तव्य करतात.

त्यामुळेच पिंपळाची पूजा लाभदायक मानली जाते. पिंपळाच्या झाडाच्या पुजेमुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात तसचं पितृदोष दूर होतो असं मानलं जातं. peepal worship time evening avoid mistake money outflow

हिंदू धर्मामध्ये Hindu Religion पिंपळाचं स्थान पूजनिय आहे. पिंपळाचं झाडं हे अत्यंत पवित्र आणि मंगलदायी मानलं जातं. पौराणिक कथेनुसार Mythology पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंच वास्तव्य आहे तर खोडात केशव, फांद्यामध्ये नारायण, पानांमध्ये हरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचं वास्तव्य करतात.

त्यामुळेच पिंपळाची पूजा लाभदायक मानली जाते. पिंपळाच्या झाडाच्या पुजेमुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात तसचं पितृदोष दूर होतो असं मानलं जातं.Peepal Puja

याशिवाय पिंपळाच्या झाडाची पुजा Pooja केल्याने पाप आणि वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते. पिपळाची योग्य विधीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुजा केल्यास लक्ष्मी मातेची कृपा राहते.

तसचं दर शनिवारी नियमितपणे सकाळच्या वेळी पिंपळाला जल अर्पण केलं आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळते. pipal puja niyam

यावेळी करू नका पिंपळाचं पूजन

पिंपळाच्या झाडाची पूजा कधीही सुर्योद्यपूर्वी करू नये. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं. शास्त्रांनुसार सुर्योद्यपूर्वी पिंपळामध्ये अलक्ष्मी वास करते जिला दारिद्र्याचं  प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच जर तुम्ही सुर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा केली तर घरात समस्या येत राहतील आणि गरीबीचा सामना करावा लागेल. 

यामुळेच सुर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा तर करू नयेच शिवाय पिंपळाच्या झाडाजवळही जाऊ नये. तसचं कधीही रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालू नये. 

हे देखिल वाचा-

पिंपळाच्या पुजेची योग्य वेळ

सुर्योदयानंतर आंघोळ करून सुर्याला अर्ध्य अर्पण करून मग पिंपळाची पुजा करावी. यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतील. सुर्योदय झाल्यानंतर तांबं किंवा पितळेच्या पात्रातून पिंपळाला पाणी अर्पण करावं.

त्यानंतर पिंपळाला ७ परिक्रमा लावाव्या. या मुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसचं कधीही सुर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला कधीही पाणी अर्पण करू नये. peepal puja vidhi

कार्तिक महिन्यात पिंपळाची पुजा लाभदायक

हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला पूजनीय स्थान देण्यात आलंय. पुराणानुसार पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंचं स्थान आहे. कार्तिक महिना हा भगवान विष्णूना समर्पित करण्यात आला आहे.

त्यामुळेच कार्तिक महिन्यात पिंपळाची पूजा केल्यास अनेक समस्या दूर होवून आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं मानलं जातं. peepal puja beenfit

पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदोष तसचं साडेसातीपासून सुटका होते. तसचं पितरांचा आशीर्वाद मिळतो. ग्रहदोष बाधा, कालसर्प दोष, पितृदोष शांतीसाठी देखील पिंपळाची पूजा लाक्षदायक ठरते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT