Pitru Paksha 2022 Esakal
संस्कृती

Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

365 दिवसांपैकी 15 दिवसाचा हा पंधरवाडा आपल्या पूर्वजांना समर्पित करण्यासाठी असतो.

सकाळ डिजिटल टीम

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या पर्यंतचा 15 दिवसांचा संपूर्ण पंधरवाडा पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो. यावर्षी 11 ते 25 सप्टेंबर या तारखे दरम्यान पितृ पक्ष साजरा केला जाणार आहे.

Pitru Paksha 2022 Date and Time: गणपती बाप्पा उठले की, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावस्या पर्यंतचा 15 दिवसांचा संपूर्ण पंधरवाडा पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो. हा पंधरवाड्या म्हणजे पूर्वजांना तृप्त करण्यासाठी असतो.त्यामुळे या पंधरवाड कोणतेही शुभ कार्य सुरू करता येत नाही. त्यामुळे आपण सुध्दा या पंधरवाड्यात कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये किंवा नवीन डिल सुध्दा नये. कारण या पंधरा दिवसाचा सगळा वेळ हा फक्त आपले पुर्वज म्हणजे पितर यांच्या समोर नतमस्तक होण्याकरीता राखीव ठेवलेला असतो.

वर्षातील 15 दिवस पूर्वजांना समर्पित केलेच पाहिजे कारण..

365 दिवसांपैकी 15 दिवसा हा पंधरवाडा आपल्या पूर्वजांना समर्पित करण्यासाठी असतो, ज्याप्रमाणे श्रावण हा महिना संपूर्ण वेळ महादेवाला समर्पित आहे. मशारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीचे 9 दिवस हे देवीला समर्पित असतात, त्याचप्रमाणे शास्त्रात पितरांसाठीही देखील या पंधरवड्याची तरतूद करण्यात आली आहे. यावरून पितर आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट होते.

आता बघू या पितर ,पितृ कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती...

या जगात निर्माता देव एक आहे, पण पितर अनेक असू शकतात. त्याचा संबंध आपल्या जुण्या परंपरेशी आहे. आता हे पितर कोण आहेत हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. पित्रर हे आपल्या जीवनात अदृश्य सहाय्यक आहेत. आपल्या जीवनातील कार्ये आणि ध्येयांवर त्यांचे पूर्ण शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतात. म्हणजे पूर्वज प्रसन्न झाले तर आपल्या त्यांचा सदैव अदृश्य आधार मिळत राहतो, ज्याप्रमाणे सायकल चालवताना जोराचा वारा एकाच दिशेने वाहतो, तर कमी प्रयत्नात जास्त अंतर कापले जाते. त्याचप्रमाणे पूर्वज सुखी असतील तर जीवनाची गाडी सुरळीत चालते आणि पूर्वज रागावले तर सायकल चालवताना विरुद्ध वाऱ्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते, तीच परिस्थिती जीवनाच्या वाहनाची होते.

पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि श्राद्ध करणे आवश्यक असते.
पितृ म्हणजे ज्यांनी पूर्वीचा देह त्यागला आहे, पण अजून पुढचा देह प्राप्त केलेला नाही. हिंदू तत्वज्ञान मानते की आत्मा स्थूल शरीर सोडतो, मग मृत्यू होतो. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करणे आणि तर्पण म्हणजे त्यांच्या मनाचे मानसिक समाधान करणे. आता प्रश्न असा आहे की श्रद्धा कशी व्यक्त करायची आणि कशी अर्पण करायची.

आता प्रश्न असा पडतो की पितरांना श्रद्धा कशी व्यक्त करायची आणि कशी अर्पण करायची?

शास्त्रात असेही सांगितले आहे की, पितरांच्या आशीर्वादाने श्राद्ध करणार्‍या व्यक्तीला जीवन, पुत्र, कीर्ती, बल, वैभव-सुख आणि वरदान प्राप्त होते, म्हणून प्रत्येक व्यक्तीने आश्विन महिन्यात संपूर्ण कृष्णाची पूजा करावी. पक्ष म्हणजे 15 दिवस दररोज नियमित स्नान करून पितरांना नमस्कार करावा आणि शेवटच्या दिवशी पिंडदान श्राद्ध करावे.पितरांबद्दल मनात नेहमी आदर आणि कृतज्ञता ठेवावी.
श्राद्ध आणि तर्पण हे परंपरेने पूर्वजांना संतुष्ट करण्याचा विषय आहे, परंतु ते थोडे सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू या..घाटावर जाणे,पिंड दान करणे या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण अशा गोष्टी मुळे आपल्या पूर्वज हे समाधानी राहतात. पितृ पक्ष हा भावना आणि आदर व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT