August Month Festivals 2023 esakal
संस्कृती

August Month Festivals 2023 : ऑगस्ट महिन्यात आहेत हे महत्वाचे सण अन् दिवस, जाणून घ्या

ऑगस्टमध्ये अधिकमास संपून श्रावण सुरु होत असल्याने याकाळात विशेष सणवार अन् व्रत वैकल्यांची सुरुवात होते.

धनश्री भावसार-बगाडे

Religious Days And Festivals Of August Month 2023 In Marathi :

प्रत्येकच महिन्यात काही तरी व्रत-वैकल्ये अन् धार्मिक दिवस असतात. पण यंदा अधिकमास आल्याने सणवार एक महिना पुढे सरकले आहे. आता जुलै संपून ऑगस्ट महिना लागत आहे. यात ऑगस्टमध्येच अधिकमास संपून श्रावणही सुरु होणार आहे. त्यामुळे श्रावणापासून लागोपाठ येणाऱ्या सणावारांची आणि व्रत वैकल्याच्या खास दिवसांची सुरुवात याच महिन्यात होणार आहे.

त्यामुळेच ऑगस्टमध्ये येणार धर्मिक विशेष दिवस, सणवार आणि खास दिवस कोणते आणि कधी जाणून घेऊया.

August Month Festivals 2023

संकष्टी चतुर्थी

दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते. पण गणेश भक्तांसाठी त्याला कायमच विशेष महत्व असते. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास ठेवून रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी गणपतीच्या आराधनेला फार महत्व असते. ऑगस्ट महिन्यांत संकष्टी चतुर्थी दि. ४ ऑगस्ट रोजी अधिक श्रावणातली संकष्टी चतुर्थी येणार आहे.

August Month Festivals 2023

कमला एकादशी

शनिवार १२ ऑगस्टला अधिकमासाच्या शुक्ल पक्षातली एकादशी असून या एकादशीला कालनिर्णयमध्ये पुरुषोत्तम आणि कमला एकादशी म्हणण्यात आले आहे. पुरुषोत्तम हे श्री विष्णूंचे नाव आहे. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या या एकादशीचे महत्व इतर एकादशींपेक्षा कितीतरी पटीने अधिक सांगितले आहे. एकादशीच्या व्रताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे.

फ्रेंडशीप डे

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येतो. यंदा हा दिवस ६ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे.

August Month Festivals 2023

स्वातंत्र्य दिन आणि पतेती

  • मंगळवारी १५ ऑगस्टला अमावस्या आहे. याच दिवशी भारतातचा स्वातंत्र्य दिन आणि पतेती आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.

  • तसेच पारशी समादाचे नववर्ष असणारा पतेती हा सणही याच दिवशी आहे.

August Month Festivals 2023

पहिला श्रावण सोमवार अन् नागपंचमी

सोमवार २१ ऑगस्टला निज श्रावण शुक्ल पंचमी आहे. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहेत. श्रावण महिन्यात शंकराच्या उपासनेला विशेष महत्व असते. श्रावण महिन्यात रोजच काहीना काही व्रतवैकल्य आणि देवता पूजेचं महत्व आहे.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हटला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे.

August Month Festivals 2023

पुत्रदा एकादशी

श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या वर्षी रविवार २७ ऑगस्टला पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या एकादशीचे महात्म्य ऐकून व्यक्ती सर्व पापांतून मुक्त होतो आणि जिवंत असे पर्यंत सुख समृद्धी आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी मान्यता आहे. पुत्रप्राप्ती व्हावी या हेतून या दिवशी विष्णू पूजेचेही महत्व सांगितले जाते.

August Month Festivals 2023

रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा

श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्फण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्मिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. हा सण खास भाऊ-बहिणींचा असतो. यंदा रक्षाबंधन ३० ऑगस्टला आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT