sant tukaram maharaj palkhi akluj ringan wari warkari ashadi wari culture sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : तुकोबारायांच्या पादुकांना आज नीरा स्नान; अकलूजला तिसरे गोल रिंगण रंगणार

इंदापूरला सकाळी देवस्थानच्या वतीने पादुकांची पूजा होऊन सोहळा मार्गस्थ झाला

राजेंद्रकृष्ण कापसे

सराटी : उन्हात चाल, वाटचालीचा मोठा टप्पा, उखळी तोफांचा बार, फटाक्यांची लड, रांगोळीच्या पायघड्या, ग्रामस्थांच्या खांद्यावर पालखीवर पुष्पवृष्टी, दर्शनासाठी झालेली गर्दी आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील ‘भक्तीचा भावसागर’ सराटी मुक्कामी विसावला.

इंदापूरला सकाळी देवस्थानच्या वतीने पादुकांची पूजा होऊन सोहळा मार्गस्थ झाला. गोकुळीचा ओढा, वडापुरी येथे विसावा घेत सुरवड येथे पालखी साडे अकरा वाजता पोचली. पाऊण वाजता सोहळा मार्गस्थ झाला. सुरवड गावाच्या पुढील बाजूस शेरकरबाबा महाराज यांचे समाधी मंदिर आहे. पालखी रथ येथे आल्यावर थांबतो. शेरकरबाबा श्रीविठ्ठलाचे व संत तुकाराम यांचे निस्सीम भक्त होते. मंदिरासमोर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली.

सोहळा वकील वस्तीला पोचला. येथील खिंड फोडली असून पालखी महामार्गावर येथे पुलाची चौकट उभी केली आहे. त्यावरून सोहळ्यावर पुष्पवृष्टी झाली. आजच्या वाटचालीत बावडा गावाच्या वेशीवरून पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. बावडा हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गाव आहे. त्यांनी व कुटुंबीयांनी दर्शन घेत पालखीला खांदा दिला.सोहळा सराटीत विसावल्यानंतर रात्री कीर्तन धोंडोपंत दादा दिंडीच्या वतीने, तर जागर केसापुरीकर यांच्या वतीने झाले.

मंत्रमुग्ध करणारी शेजारती

रोज रात्री कीर्तन झाल्यावर शेजारती सुरू होती. पुंडलिक महाराज देहूकर व विश्वस्त व नामदेव चोपदार गिराम, वारकरी, पखवाज, वादक यांच्या उपस्थितीत सुरू होते. पालखीतील पादुका मंडपात पूजेसाठी आणल्या जातात. त्यावेळी, ‘तुकाराम तुकाराम’ असे भजन सुरू होते. यावेळी संस्थानच्या वतीने पादुकांची पूजा सुरू असते.

यावेळी ‘कणकाचे परियळ उजळोणी आरती’ हा मानाचा अभंग होतो. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची आरती होती. त्यानंतर धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥ हा अभंग होतो. आणि शेजारती संपते. त्यातून देवाला झोपण्याची विनवणी असते.

नीरा स्नान आणि रिंगण

पालखीचा पुणे जिल्ह्यातील आज शेवटचा मुक्काम होता. संत तुकोबारायांच्या पादुकांचे शनिवारी (ता.२४) नीरा स्नान होईल. त्यानंतर सोहळा सोलापूर जिल्हात प्रवेश करतो. अकलूजच्या माने विद्यालयात उद्या तिसरे गोल रिंगण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold And Silver: सेबी गोल्ड-सिल्व्हर ईटीएफ नियमांमध्ये सुधारणा करणार? गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार; नवा नियम काय?

USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

SCROLL FOR NEXT