Ghodeshwar Temple Palkhi Sohala Kurukali Kolhapur
Ghodeshwar Temple Palkhi Sohala Kurukali Kolhapur esakal
संस्कृती

Ghodeshwar Palkhi Sohala : हालगी, घुमकं, कैताळाच्या निनादात घोडेश्वर डोंगरावर पालखी सोहळा; महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांची हजेरी

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे तसेच कर्नाटकातील हजारो भाविकांनी घोडेश्वर डोंगरावर हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले.

मुरगूड : गुलाल-खोबऱ्याची उधळण, हालगी, घुमकं, कैताळाची साथ व ‘घोडेश्‍वरच्या नावानं चांगभलं...’चा जयघोष करत महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान कुरुकली (ता. कागल) येथील घोडेश्वरचा पालखी सोहळा झाला.

कुरुकलीतील घोडेश्वर मंदिराच्या (Ghodeshwar Temple Kurukali) यात्रेस घटस्थापनेपासून प्रारंभ झाला होता. यावेळीही पाचव्या माळेपासून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे तसेच कर्नाटकातील हजारो भाविकांनी घोडेश्वर डोंगरावर हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले. शनिवारी रात्री श्रींची उत्सवमूर्ती मिरवणुकीने गावातून मंदिरात नेण्यात आली.

यावेळी महिलांनी औक्षण करून देवदर्शनासाठी गर्दी केली होती. रविवारी सायंकाळी प्रतिवर्षीप्रमाणे कुस्ती मैदान झाले. जागरानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचा लाभ भाविकांनी घेतला. सायंकाळी पालखी सोहळा झाला. कुरुकली, सुरुपली व बेनिक्रेतील मानाचे गावकरी आल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित महिलांनी घोडेकर.च्या नावानं चांगभलं..चा जयघोष करत पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.

पुजारी अजित कांबळे यांनी गाऱ्हाणे घातले. मंदिर परिसरात खेळण्यांची, खाऊची दुकाने, मनोरंजनाची साधने दाखल झाली होती. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मुरगूड पोलिस ठाणे व स्वराज्य रेस्क्यू फोर्स बिद्री यांनी बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT