Shravan 2022 
संस्कृती

Shravan 2022 : जालन्यातील पंचमुखी महादेव

पंचमुखी महादेव मंदिर, श्री पंचमुखी महादेव

सुहास सदाव्रते

जालना : सा धारणपणे चारशे वर्षापेक्षा अधिक काळापासून, तेव्हाच्या काळातील ‘जनकपुरी’ वा ‘हिरवळी’ या कुंडलिका, सीना आणि गंगा अशा त्रिवेणी संगमावर आताच्या जालना शहरात पाणीवेस काद्राबाद परिसरात पंचमुखी महादेव मंदिर आहे. हजारो भाविकांची अपार श्रध्दा असलेले हे देवस्थान आहे. तीन नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने पूर्वी हिमाचल प्रदेश, बद्रिनाथ, केदारनाथ अशा तीर्थक्षेत्रातील नागा साधूंचा जथ्था या मंदिरात यायचा. आजही अनेक साधू या मंदिरात येतात. चारशे वर्षांपासून या मंदिराची परंपरा असल्याचे सांगितले जाते.

त्याकाळी जनकपुरी असे नाव असलेल्या आजच्या या शहरात गंगाद्वार हा एक भाग होता. याला नंतर निजामकाळात ‘पाणीवेस’ असे नाव पडल्याचे बुजुर्ग मंडळी सांगतात. आताच्या काद्राबाद परिसरात पाणीवेस भागात लाकडाचा व्यवसाय करणारे चौधरी कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील आठवी पिढी पंचमुखी महादेव मंदिरात सेवेकरी, पुजारी म्हणून कार्यरत आहे. निजामकालीन राजवटीत तळघरात पंचमुखी असल्याचे येथील पुजारी सांगतात. पूर्वी सागवानापासून बनविलेला सभामंडप होता. नंतर टीनपत्रे आले आणि आता पक्के बांधकाम आहे.

श्रावणात दिवसभरात पंचमुखी महादेवाची पाच वेळा आरती होते. श्रावणात धार्मिक कार्यक्रमांसह सप्ताह, दररोज महाप्रसाद दिला जातो. या मंदिरात दीड महिना श्रावणाचा मानला जातो. मुख्य मंदिर परिसरात निळकंठेश्वर, शनी, विष्णू- लक्ष्मी, हनुमान, विठ्ठल- रुक्मिणी, दुर्गामाता, दत्त अशी छोटी मंदिरे आहेत. कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अय्यपा मंदिरही आहे. आम्ही मनोभावे भोलेनाथाची सेवा करीत आहोत. मंदिर प्राचीन आहे, हे कळतही नाही, अशी भावना मंदिराचे मुख्य पुजारी प्रताप महाराज चौधरी यांनी व्यक्त केली.

कसे जायचे?

  • जालना बस स्थानकावरून जवळच पाणीवेस भाग

  • जालना रेल्वेस्टेशन मार्गे मस्तगड, नवीन पूल आणि काद्राबाद असे जाता येते

  • मंठा चौफुली मार्गे आल्यास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे थेट काद्राबाद भागात जाता येते.

- सुहास सदाव्रते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT