Surya Arghya esakal
संस्कृती

Surya Arghya : सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला अर्घ्य देण्याचे अनेक फायदे असल्याचं सांगण्यात आलं आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Correct Procedure Of Giving Water To Sun : हिंदू संस्कृतीत सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या कृतीतून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे फायदे आणि महत्वही सांगण्यात आले आहेत. अशीच एक पद्धत म्हणजे सकाळी सूर्याला अर्घ्य देणे.

अनेक जण सकाळी सूर्याला जल अर्पण करतात. पण बऱ्याचदा ते आपल्या सोयीनुसार असते. अशावेळी शास्त्रानुसार योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणं आवश्यक आहे.

Surya Arghya

सूर्याला नियमित अर्घ्य दिल्याने व्यक्तीच्या अनेक कष्टांचे निवारण होते असं मानलं जातं. सकाळी उगवत्या सुर्याला अर्घ्य दिल्याने तुम्हालाही ऊर्जावान वाटते. असं केल्याने घरात सुख-समृद्धीचा वास होतो, असं मानलं जातं. पण यासाठी वेळ आणि इतर नियम महत्वाचे असतात.

Surya Arghya

नियम

  • सूर्योदयानंतरच्या तासाभराच्या आतच हे अर्घ्य दिले जायला हवे.

  • अर्घ्य देण्याआधी स्नान करून सुचिर्भूत होऊनच सूर्याला पाणी अर्पण केले जावे.

  • अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यावा.

  • त्या पाण्यात फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या घालाव्या.

  • सूर्योदय पुर्व दिशेने होत असल्याने पुर्वेकडे तोंड करूनच अर्घ्य द्यावे.

  • सूर्याला अर्घ्य देताना पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून सूर्यकिरण परावर्तीत होणे अधिक चांगले समजले जाते.

  • अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pali News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सोमवारपासून कार्यालये गजबजणार

Nagpur News : शाळेत विद्यार्थिनींना शिक्षिकेकडून अमानुष मारहाण; शिक्षिकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime : अजनीत धक्कादायक प्रकार! वडिलांकडून मुलावर चाकू हल्ला

Dimbhe Dam Issue : डिंभे धरणाच्या गळतीबाबत दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने १७१ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी

Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT