vastu tips sakal
संस्कृती

Vastu Tips: घरात अशा पद्धतीने चुकूनही ठेवू नका चपला, येऊ शकते संकट

शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत.

Aishwarya Musale

वास्तुशास्त्रानुसार हिंदू धर्मात घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. अशा परिस्थितीत वस्तू ठेवण्यापूर्वी योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

खरं तर, वास्तुशास्त्रात इतर गोष्टींप्रमाणेच शूज आणि चप्पल देखील योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण शूज आणि चप्पल योग्य ठिकाणी किंवा व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही घरात शूज आणि चप्पल इकडे तिकडे किंवा उलटे ठेवत असाल तर देवी लक्ष्मी यामुळे नाराज होते. घरात दारिद्र्य असते. त्यामुळे शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. चला, जाणून घेऊया यामागे कोणती कारणे दडलेली आहेत.

घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने या समस्या उद्भवतात

ग्रह दोषांचं हे कारण ठरू शकतं : ज्योतिषाच्या मते, घरात चप्पल किंवा शूज उलटे ठेवल्याने घरात ग्रह दोषांचा त्रास वाढतो. याशिवाय माता लक्ष्मीलाही राग येतो आणि त्यांना त्या घरात राहणे आवडत नाही. अशा स्थितीत घरात गरिबी असते.

आजारपणाची कारणे : वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या दारात चप्पल उलटे ठेवली तर त्याचा घरातील सदस्यांच्या विचारावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे घरात आजार आणि दु:ख येऊ लागते. यासाठी चप्पल आणि शूज उलटे दिसले तर ते लगेच सरळ करावेत.

घरामध्ये नकारात्मकता वाढेल: ज्योतिषाच्या मते, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नकारात्मक ऊर्जा आत येऊ लागते. त्यामुळे उलटे शूज आणि चप्पल कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये अडथळा ठरतात.

बुट आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत.

चप्पल आणि बुट उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा संपते. ही दिशा माता लक्ष्मीची आहे आणि या दिशेला चप्पल ठेवल्याने माता लक्ष्मीचा वास घरात राहत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT