

Kolhapur Crime, Girlfriend Death, Bhudargad
कोल्हापूर: दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीला कड्यावरून ढकलून तिचा खून केल्याची घटना नाईकवाडी (ता. भुदरगड) येथे घडली. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. गारगोटी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.