work desk sakal
संस्कृती

Vastu Tips: चुकूनही 'या' गोष्टी वर्क टेबलवर ठेवू नयेत, वास्तुशास्त्रात म्हटलंय...

अनेकदा आपण लक्ष देत नाही पण वर्क टेबलवर काहीही ठेवतो.

Aishwarya Musale

असे बरेचदा घडते की आपल्याला आपले काम करावेसे वाटत नाही किंवा आपल्या कामात अनेकदा चुका होतात. असे कधी कधी घडणे सामान्य आहे, पण जर तुमच्यासोबत असे सतत होत असेल तर तुम्ही थोडे सावध राहायला हवे.

कधी कधी आपल्या छोट्या-छोट्या वास्तू चुकांमुळे आपल्याला काम करावेसे वाटत नाही किंवा आपली कामाशी निगडीत वाढ थांबते. अनेकदा आपण लक्ष देत नाही पण वर्क टेबलवर काहीही ठेवतो.

मात्र, असे केल्याने कामावर मोठा परिणाम होतो. तुम्हाला माहीत नसेल, पण वास्तुनुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वर्क टेबलवर ठेवू नयेत, अन्यथा कामावर नकारात्मक प्रभाव पडतो. तुम्ही तुमच्या वर्क टेबलवर या गोष्टी ठेवू नये.

निरुपयोगी वस्तू ठेवू नका

अनेक वेळा आपण वर्क टेबलवर अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यांचा आपल्या कामाशी काहीही संबंध नसतो किंवा ते काम आधीच पूर्ण झालेले असते. अशा परिस्थितीत आपण अजूनही त्या फाईल्स किंवा डॉक्यूमेंट्स टेबलावर ठेवतो. आपण अशा निरुपयोगी वस्तू वर्कटेबलवर ठेवू नये. यामुळे व्यक्तीला आपल्या कामात रस वाटत नाही. त्याच वेळी, त्याच्या कामात वारंवार चुका होण्याची शक्यता देखील लक्षणीय वाढते.

वाईट वस्तू टाळा

काहीवेळा काही स्टेशनरी जसे की पेन इत्यादी खराब होतात किंवा कंप्यूटरचा काही भाग किंवा इंक कार्टेज इत्यादी व्यवस्थित काम करत नाहीत. परंतु आपण ते वर्क टेबलवर देखील ठेवतो जेणेकरून आपल्याला त्यांची नंतर दुरुस्ती करता येईल.

तरी आपण या सर्वांची त्वरित दुरुस्ती करावी. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर ते वर्क टेबलवरून काढून टाका. या नॉन-वर्किंग वस्तू डेड आइटम मानल्या जातात. अशा डेड आइटम्समुळे तुमची कार्यक्षमता कमी होते.

असे फोटो ठेवू नका

अनेकदा त्यांचे वर्कटेबल डेकोरेट करताना लोक त्यावर फोटोही ठेवतात. परंतु जुन्या आठवणींना उजाळा देणारे असे कोणतेही फोटो तेथे ठेवू नये. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जी आता या जगात नाही किंवा ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम केले, पण आता तो तुमच्यापासून दूर आहे.

अनेक वेळा असे फोटो पाहून खूप वाईट वाटते. हे तुमच्या कामासाठी चांगले नाही. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही फक्त कामाच्या वेळेतच काम केले पाहिजे.

आरसा ठेवू नका

तुम्ही तुमच्या वर्कटेबलवर कधीही आरसा ठेवू नये. अशाप्रकारे, वर्कटेबलवर ठेवलेला आरसा नकारात्मकता निर्माण करतो. ज्यामुळे तुमचे ऑरा खराब होते. ऑरा खराब झाल्यामुळे, तुम्हाला असे वाटते की तुम्ही बराच वेळ बसून काम करत आहात, परंतु काम झाले नाही. अशा नकारात्मक भावनांमुळे मनात कामाबद्दल उदासीनता निर्माण होते.

टेबलक्लोथ

काही लोक त्यांच्या वर्कटेबल क्लीन आणि ब्यूटीफुल बनवण्यासाठी, टेबलक्लॉथ ठेवतात. पण तुमचा टेबलक्लॉथ घाण झाला असेल किंवा कुठेतरी फाटला असेल तर लगेच काढून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT