Cm Eknath Shinde Vitthal Pooja Sakal
संस्कृती

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा पहिला वारकरी कसा निवडला जातो?

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो.

वैष्णवी कारंजकर

वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी आणि त्यांचा पांडुरंग यांच्यात आता केवळ एक दिवसांचं अंतर राहिलं आहे. एवढे दिवस पायी वारी करून आलेल्या, दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना आता विठूदर्शनाची आस लागली आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठोबाचं 'याचि देहि याचि डोळा' दर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. यावेळी एका वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो. पण कोणत्या वारकऱ्याला मान द्यायचा हे कसं ठरतं?कोण ठरवतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

१९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्यासोबत हे वारकरी दांपत्य उपस्थित असतं. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला असतो. विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. त्यावेळी मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते.

यावेळी दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दांपत्याला हा मान मिळतो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल, त्यांना पूजेसाठी बोलावलं जातं. शिवाय मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कारही केला जातो.

पंढरपूर नगरी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सज्ज

राज्यातल्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही आता लाखो भाविकांचं पंढरीमध्ये आगमन होत आहे. आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या मानाच्या सगळ्या पालख्यांचं पंढरपूरजवळच्या वाखरी पालखी तळावर आगमन झालं आहे. पंढरीतले मठ, लॉज, विठ्ठर रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास गर्दीने भरुन गेले आहे. विठ्ठलदर्शनासाठी रांग लावून असलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने तांदळाच्या खिचडीचं वाटप करण्यात आलं.

आषाढी एकादशी मुहूर्त

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी 29 जून रोजी पहाटे 3:18 वाजता सुरू होईल आणि 30 जून रोजी दुपारी 2:42 वाजता समाप्त होईल.भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT