How Gajakesari Yoga Will Affect Your Fortune This Week: जून महिन्यातील हा आठवडा खगोलशास्त्राच्या दृष्टीने खूप खास मानला जातोय. यावेळी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच गुरु आणि बुध हे ग्रह आहेत. त्यामुळे बुध आणि सूर्य यांचा एक खास योग म्हणजे बुधादित्य योग तयार होईल.
दुसरीकडे, चंद्र धनू राशीत जाईल आणि गुरुसोबत त्याचा समसप्तक योग होईल, ज्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. याव्यतिरिक्त, १३ जून रोजी शुक्र भरणी नक्षत्रात जाईल आणि गुरु आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. या सर्व ग्रह हालचालींचा परिणाम आपल्या सर्व १२ राशींवर होणार आहे.
या आठवड्यात संयम ठेवणं अत्यावश्यक ठरेल. कामाच्या ठिकाणी छोट्या गोष्टींवरून चिडचिड होऊ शकते, पण त्याचा परिणाम नात्यांवर आणि निर्णयक्षमतेवर होऊ शकतो. सहकाऱ्यांशी समन्वय साधणं फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. प्रेमसंबंधांमध्ये घाई करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ रंग: गुलाबी
शुभ अंक: ३
या आठवड्यात आर्थिक लाभाचे योग आहेत, पण खर्चातही वाढ होऊ शकते. कुटुंबासाठी खर्च वाढू शकतो. नोकरीतील जबाबदाऱ्या वाढतील. प्रवासाच्या योगातून लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याच्या शेवटी काळजी घ्या. नात्यांमध्ये स्थैर्य राहील.
शुभ रंग: तपकिरी
शुभ अंक: १०
या आठवड्यात भाग्य तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यवसाय किंवा संपत्ती संबंधित महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. महिलांना करिअरमध्ये विशेष प्रगतीचा योग. आरोग्य सामान्य राहील.
शुभ रंग: राखाडी
शुभ अंक: १
आकस्मिक धनलाभाचे संकेत आहेत. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. बढती किंवा हवी असलेली बदली शक्य आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आठवडा उत्तम आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. कुटुंबात चांगली बातमी मिळू शकते.
शुभ रंग: जांभळा
शुभ अंक: ७
मेहनत आणि नशिबाच्या जोरावर फायदा मिळेल. कामाशी संबंधित प्रवासातून लाभ होईल. नवीन नोकरी किंवा जबाबदारी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य लाभेल. धार्मिक कार्यात मन रमेल. प्रेमसंबंधांतील गैरसमज दूर होतील.
शुभ रंग: सोनेरी
शुभ अंक: ८
आठवड्याची सुरुवात धावपळीत जाईल. कामावर तणाव वाढू शकतो. महिला जातकांना ऑफिस आणि घर यामध्ये समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांकडून अडथळे येऊ शकतात. आरोग्य आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष द्या.
शुभ रंग: नारिंगी
शुभ अंक: १२
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. लालच किंवा भावनांमध्ये वाहून जाऊ नये. नवीन संधी असतील तर विचारपूर्वक स्वीकारा. आर्थिक निर्णयांमध्ये विशेष काळजी घ्या. प्रवासात वस्तूंची काळजी घ्या. वैवाहिक जीवन मैत्रीपूर्ण राहील.
शुभ रंग: निळा
शुभ अंक: ५
काही जुने अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. सहकाऱ्यांशी समन्वय लाभदायक ठरेल. नवीन उपक्रम सुरू करताना मार्गदर्शन घ्या. संतुलित वागणं आणि संयम प्रेमसंबंध टिकवून ठेवेल.
शुभ रंग: पांढरा
शुभ अंक: ११
कामातील अडथळे दूर होऊन कामाची गती वाढेल. धैर्याने काम करत राहिल्यास नवे मार्ग खुलतील. महत्त्वाचे लोक भेटतील. जुन्या आजारांची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. नात्यांमध्ये गोडवा राहील.
शुभ रंग: पांढरा
शुभ अंक: १४
भावनांमध्ये वाहून घेतलेले निर्णय त्रासदायक ठरू शकतात. स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नका. आरोग्याबाबत सतर्कता बाळगा. घरातील वादग्रस्त विषयांवर विचारपूर्वक भूमिका घ्या. वैवाहिक नात्यांमध्ये मानसिक आधार मिळेल.
शुभ रंग: काळा
शुभ अंक: ८
करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. बढती किंवा आर्थिक लाभ संभवतो. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंद वाढेल. प्रेमसंबंध घट्ट होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.
शुभ रंग: लाल
शुभ अंक: २
शॉर्टकटचा मार्ग न पत्करता परिश्रमावर भर द्या. आरोग्याबाबत काळजी घ्या. आधी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नात्यांमध्ये समतोल राखण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. आध्यात्मिक प्रवास मन:शांती देईल.
शुभ रंग: पिवळा
शुभ अंक: ६
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.