अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आली होती. मात्र ही नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे अजूनही या नाल्यात कचरा असल्याची तक्रार भाजपाचे अंबरनाथ पश्चिम सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी अंबरनाथ नगरपालिकेत केली होती. तसंच या नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नाल्याची व्यवस्थित सफाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र याचा राग धरून स्वामीनगर परिसरातील दोन ते तीन जणांनी मिळून त्यांना रात्रीच्या सुमारास मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.