When is Mangalagaur 2025 sakal
संस्कृती

Mangalagaur 2025: यंदा कधी आहे मंगळागौर? जाणून घ्या तारखा, महत्त्व आणि या व्रताचे लाभ

Magalagaur Vrat Dates 2025: श्रावणातील मंगळागौर व्रत 2025 मध्ये कधी आहे, याचे महत्त्व आणि फायदे जाणून घ्या.

Anushka Tapshalkar

Mangala Gauri Vrat Significance for Married Women: हिंदू धर्मात मंगळागौरी व्रताला विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. वर्ष 2025 मध्ये श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होऊन 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात मंगळागौरी व्रत चार मंगळवारी पाळलं जाईल.

कधी आहे मंगळागौर व्रत

  • पहिलं व्रत: 29 जुलै 2025

  • दुसरं व्रत: 5 ऑगस्ट 2025

  • तिसरं व्रत: 12 ऑगस्ट 2025

  • चौथं व्रत: 19 ऑगस्ट 2025

मंगळागौर व्रताचं महत्त्व

मंगळागौर व्रत हे सौभाग्य, सुख-शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळलं जातं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संणांपैकी एक असलेला मंगळागौर हा सण खासकरून नवविवाहीत महिलांसाठी असतो. या दिवशी विविध पारंपरिक खेळ, गायन, नृत्य केले जाते. या दिवशी महिला देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करतात.

हे व्रत करताना महिला सकाळी स्नान करून संकल्प करतात आणि मंगळागौरीची पूजा, मंत्र, कथा आणि आरती करतात. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर व्रत पूर्ण केलं जातं. काही महिला या दिवशी उपवास करून फक्त फळं, दूध किंवा हलका आहार घेतात.

मंगळागौर व्रताचे लाभ

  • पतीचे आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते

  • वैवाहिक जीवनात सामंजस्य, प्रेम आणि सुख वाढते

  • घरामध्ये सौख्य, समृद्धी आणि शुभतेचा वास राहतो

  • स्त्रीच्या मनोकामना पूर्ण होतात

  • आपत्य, कुटुंब आणि पतीसाठी रक्षाकवच मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षण जनजागृती रथाचे फुलंब्रीत उत्साहात स्वागत

SCROLL FOR NEXT