

A tragic incident occurred at a wedding in Jamshedpur where a man died after a rasgulla got stuck in his throat, highlighting the dangers of food choking.
esakal
झारखंडमधील जमशेदपूर येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका लग्नसमारंभादरम्यान झालेल्या या घटनेत ४१ वर्षीय ललित सिंह यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री उशिरा मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. एक 'रसगुल्ला'घशात अडकल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली; त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देताना, रुग्णालयातील डॉक्टरांनी आता यामागील मूळ कारणही स्पष्ट केले आहे. घशात रसगुल्ला अडकल्यामुळे ललित यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे डॉक्टरांनी सांगितले.