Yogini Ekadashi 2024 esakal
संस्कृती

Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंना दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य, जाणून घ्या एकादशीचे महत्व

Yogini Ekadashi 2024 : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणून ओळखले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Yogini Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार दरवर्षी २४ एकादशीच्या तिथी असतात. या सर्व एकादशींना अधिक महत्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी खास व्रत केले जाते. यंदा ही एकादशी आज (२ जुलैला) साजरी केली जात आहे.

योगिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. यासोबतच अनेक जण आजच्या दिवशी व्रत अन् उपवास करतात. आजच्या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी एक धार्मिक धारणा यामागे आहे. आजच्या योगिनी एकादशीच्या निमित्ताने आज आपण या एकादशीचे महत्व आणि भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ करावे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

योगिनी एकादशीचे महत्व

योगिनी एकादशीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. योगिनी एकादशीचे पालन केल्याने मानसिक शुद्धी, आत्मसाक्षात्कार आणि भगवान विष्णूंचा आशिर्वाद मिळतो. पद्मपुराणानुसार, योगिनी एकादशी अतिशय महत्वाची आहे. संसाराच्या समुद्रात बुडालेल्या सर्व प्राण्यांसाठी ही एकादशी शाश्वत होडीसारखी आहे.

या एकादशीचे व्रत मनापासून केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. या व्रतामुळे प्राप्त होणारे फळ हे ८८ हजार ब्राह्मणांना भोजन देण्याइतके असते. तसेच, या व्रताच्या प्रभावाने जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.

योगिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंसाठी नैवेद्य :

  • भगवान विष्णूंना पंचामृत प्रिय आहे. त्यामुळे, योगिनी एकादशीला पूजेच्या शेवटी परमेश्वाला पंचामृताचा नैवेद्य दाखवा. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.

  • योगिनी एकादशीला तुम्ही पूजा झाल्यावर भगवान विष्णूला दूध आणि दह्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता.

  • या व्यतिरिक्तत तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर नैवेद्य म्हणून देवाला दाखवू शकता. ही खीर भगवान विष्णूला अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात, अशी लोकांची धारणा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT