10 Chopped Hands Recovered In Odisha
10 Chopped Hands Recovered In Odisha 
देश

ओडिशात सापडले कापलेले दहा हात

वृत्तसंस्था

जाजपूर (ओडिशा): जाजपूर येथील कलिंगा नगर भागात दहा कापलेले हात सापडले असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये या परिसरात एका प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्यांचेच हे हात असावेत असा अंदाज प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाजपूर येथे रविवारी (ता. 18) दहा कापलेले हात सापडल्याची माहिती पसरल्यानंतर खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी पोलिसांना बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2006 मध्ये कलिंगा नगरमधील स्टिल कारखान्यासाठीच्या जमिन अधिग्रहणाला स्थानिक आदिवासींनी विरोध केला होता आणि त्याविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात 13 पेक्षा जास्त आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले, पण पाच मृतदेहांची ओळख पटली नव्हती. ओळख न पटल्याने त्यांचे हात कापून त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आदिवासींच्या कुटुंबियांना मृतदेहांचे हात परत देण्यात आले. मात्र, त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आणि या हातांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.

जयपूरच्या पोलिस अधीक्षक सी. एस. मीना यांनी सांगितले की, एका वैद्यकीय बॉक्समध्ये पाच हातांच्या जोड्या आढळून आल्या आहेत. ज्या क्लबमधील मेडिकल बॉक्समध्ये हे हात ठेवण्यात आले होते, त्या क्लबची खिडकी शनिवारी रात्री काही अज्ञातांनी तोडली आणि मेडिकल बॉक्स पळवला. त्यानंतर जाजपूर येथे त्यांनी हा बॉक्स फेकला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT