photo credit - Tv18 news 
देश

शेतात नग्न अवस्थेत सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह, नराधमाने चेहराही जाळला

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील महिलावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येतंय. कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज पोलीस स्टेशन परिसरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे, शृंगीरामपूर गावात मोहरीच्या शेतात तिचा मृतदेह सापडला. यावेळी तिचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. (Uttar Pradesh Crime News)

मृतदेहाची अवस्था पाहून पोलीस आणि ग्रामस्थांनी बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. मुलीची ओळख पुसण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी तिच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याचंही स्पष्ट झालंय. क्रुरतेची सीमा गाठत नराधमांनी मुलीची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांना मृतदेहाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी (Kannauj Police) घटनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तत्काळ फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले.

कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज जवळील एका गावात शेतकऱ्याची १० वर्षांची मुलगी त्याच गावातल्या शाळेत सहाव्या वर्गात शिकत होती. घराबाहेर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. शेतकरी कुटुंबियांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, एखाद्या ओखळीच्या व्यक्तीसोबत मुलगी गेल्याची शंका मनात धरून पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं नाही.

त्यानंतर दोन दिवसांनी संध्याकाळी कमलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शृंगीरामपूर या ठिकाणाहून पोलिसांना फोन आला. गावातील रहिवासी मनशा नाथ मिश्रा यांच्या मोहरीच्या शेतात विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतात कसणाऱ्या सतीश याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT