11 Peacocks Die Krishna River in Manjari esakal
देश

राष्ट्रीय पक्षी असलेल्या तब्बल 11 मोरांचा कृष्णा काठावर मृत्यू; वनखात्यानं घेतली गंभीर दखल, विषारी धान्य घातल्याचा संशय

मृत मोर सापडल्याची बातमी पसरल्यानंतर या भागात लोकांनी गर्दी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

या मोरांना विषारी कडधान्य घातल्याचा संशय आहे; तर रासायनिक खते खाऊन हे मृत झाले असावेत, असे काहींचे मत आहे.

चिक्कोडी, मांजरी : राष्ट्रीय पक्षी असलेले तब्बल ११ मोर (Peacock) मृत होऊन पडल्याची घटना मांजरी (ता. चिक्कोडी) येथे कृष्णा काठावर शुक्रवारी (ता. १२) उघडकीस आली. याची वनखात्याच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

याबाबत माहिती अशी, मांजरी येथील कृष्णा काठावर काल (शुक्रवार) दुपारी काही नागरिकांना काही मोर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनखात्याला दिली. वनअधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध घेतला असता तब्बल ११ मोर मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, मृत मोर सापडल्याची बातमी पसरल्यानंतर या भागात लोकांनी गर्दी केली होती. वेगवेगळी चर्चा सुरू झाली. या मोरांना विषारी कडधान्य घातल्याचा संशय आहे; तर रासायनिक खते खाऊन हे मृत झाले असावेत, असे काहींचे मत आहे.

याबाबत चिक्कोडीचे वनअधिकारी (Chikkodi Forest Officer) प्रशांत गौराणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विषारी धान्य खाल्‍ल्‍याने हे मोर मृत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर याबाबत काही ठोस सांगता येईल. हे धान्य कोणी खायला घातले त्याचा तपास होईल. याबाबत गुन्हा दाखल केला जात आहे. लवकर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT