देश

'एसआयपी'तून 1.24 लाख कोटींची गुंतवणूक 

पीटीआय

मुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात 1.24 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे म्युच्युअल फंडांकडील मालमत्तेत 5.54 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. डिसेंबरअखेर म्युच्युअल फंडातील मालमत्ता 23.61 लाख कोटींपर्यंत वाढली आहे.

सलग सहाव्या वर्षाच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे दिसून आले. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाच्या (ऍम्फी) आकडेवारीनुसार, फंडातील गुंतवणूक वृद्धीदर 2017 च्या तुलनेत कमी आहे. 2017 मध्ये 5.4 लाख कोटींनी गुंतवणूक वाढली होती. घरगुती बचतीला चालना देऊन ती भांडवली बाजारात आणण्यासाठी सेबी आणि ऍम्फीकडून प्रयत्न केले जात आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांमधील जनजागृतीसाठी "म्युच्युअल फंड सही है'सारखे उपक्रम ऍम्फीने सुरू केले असून, त्याचा परिणाम म्हणून "एसआयपी'तील गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT