13 Rallies by Rahul Gandhi In Congress Plans For 80 Lok Sabha Seats In UP
13 Rallies by Rahul Gandhi In Congress Plans For 80 Lok Sabha Seats In UP 
देश

उत्तर प्रदेशात राहुल गांधींचा झंझावात; होणार 13 सभा

वृत्तसंस्था

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केली. त्यानंतर आता राहुल गांधींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. त्यानुसार 'प्लॅन' तयार केला जाणार आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील 80 जागांसाठी 13 रॅली काढण्यात येणार आहेत.

या राज्यातील लोकसभेच्या 80 जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 13 सभा या 13 झोन्ससाठी फेब्रुवारीमध्ये घेणार आहेत. या झोनमध्ये सहा लोकसभा जागांची छाणणी केली जाणार आहे. राहुल गांधींकडून या झोनमध्ये प्रत्येकी एक रॅली घेतली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी राज बब्बर यांची भेट झाली.

दरम्यान, काँग्रेस आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे प्रत्येकाला माहिती आहे. त्यासाठी आम्ही आता समविचारी पक्षांशी हातमिळवणी करणार आहोत आणि भाजपविरोधी लढणाऱ्या पक्षांशी एकत्र असणार आहोत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT