देश

खासगी कंपनीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या 169 तक्रारी

पीटीआय

नवी दिल्ली : 2017 मध्ये खासगी कंपनीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या 169 तक्रारी महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती आज महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिली. या तक्रारी "एसएचई (शी)- बॉक्‍स' या ऑनलाइन पद्धतीतून महिला आणि बालकल्याण मंत्रालयाला मिळाल्या आहेत. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे लैगिंक शोषण आणि छळास आळा बसण्यासाठी ऑनलाइन हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 

2017 मध्ये "शी-बॉक्‍स'च्या माध्यमातून 169 तक्रारी आल्या असून, सर्वाधिक तक्रारी 33 महाराष्ट्रातून आल्या आहेत. गेल्या वर्षी मंत्रालयाला लैगिंक छळाच्या 141 तक्रारी आल्या असून, त्यापैकी 41 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली. अर्थमंत्रालयाकडे सर्वाधिक 21 तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर दळणवळण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाला प्रत्येकी 16 तक्रारी आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. खासगी आणि सरकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना होत असलेल्या लैगिंक शोषणाची थेटपणे तक्रार करताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे केंद्र सरकारने "शी-बॉक्‍स' नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले.

महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने संबंधित कार्यक्षेत्रातील लैगिंक शोषणासंदर्भात तक्रारीसाठी या ऑनलाइन पोर्टलला सर्व केंद्रीय मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 653 जिल्ह्यांना जोडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT