19 year old Haryana gangster yogesh kadyan interpol red corner notice Marathi News  
देश

Crime News : साधाभोळा चेहरा पण खतरनाक गँगस्टर! १९ वर्षीय योगेशचा जगभर शोध, इंटरपोलनं काढली रेड कॉर्नर नोटीस

रोहित कणसे

वय १९ वर्षे आणि निरागस चेहरा... पण योगेश कादियान हे गुन्हेगारी विश्वातील इतके मोठं नाव बनलं आहे की, जगातील सर्व देशांचे पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. इंटरपोलने हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बेरी गावचा रहिवासी योगेश कादियान याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

इंटरपोलच्या वेबसाईटवर त्याची माहिती शेअर करण्यात आली असून, त्याचे वय केवळ १९ वर्षे असून त्याच्या डाव्या हातावर तीळ आहे. त्याचे वय अवघे १९ वर्षे आहे, कमी वयातच तो धोकादायक गुन्ह्यांमध्ये गुंतला होता. त्यामुळेच आज भारतासह अनेक देशांचे पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच एनआयएने भारतातील गँगस्टर्सवरती छापे टाकले आहेत. यामुळे अनेक गँगस्टर्स एकतर भूमिगत झाले आहेत किंवा देश सोडून पळून गेले आहेत. योगेश कादियान हा बेकायदा पासपोर्ट घेऊन भारतातून पळून गेला असून त्याने अमेरिकेत आश्रय घेतला आहे. त्याच्याशिवाय इतरही अनेक गँगस्टर्स आहेत जे बेकायदेशीर पासपोर्टवर भारतातून पळून गेले आहेत. योगेश कादियान यांचे वय पाहता गुन्हेगारी विश्वातील त्यांचे कारनामे धक्कादायक आहेत.

लहान वयात अनेक शस्त्रे चालविण्यात परंगत

इंटरपोलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, योगेश कादियान वर गुन्हेगारी कट रचणे, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारांच्या टोळीच्या माध्यमातून गुन्हे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. लहान वयातच योगेश हा अत्याधुनिक शस्त्रे चालविण्यात पारंगत मानला जातो.

मूळचा हरियाणाचा असलेला योगेश हा पंजाबमधील कुख्यात बंबीहा गँगचा ही सदस्य आहे. टोळीयुद्धाच्या अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. दिल्लीचा डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज बवानाशीही त्याचा संबंध असल्याचे बोलले जाते. काही महिन्यांपूर्वी तो अमेरिकेत पळून गेला असल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

बंबीहा गँग आणि गोल्डी ब्रार यांच्यातील भांडणादरम्यान पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची देखील हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली होती. अनेक वर्षांपासून पंजाब ते हरियाणा पर्यंत बंबीहा गँग आणि गोल्डी ब्रार गँगमध्ये यांच्यात वाद सुरू आहे. यादरम्यान अनेक वेळा गँगवॉरच्या घटना देखील झाल्या आहेत. या दोन्ही गँगमध्ये असलेले गँगस्टर कॉलेज आणि शाळेतूनत गुन्हेदारी घटनांमध्ये सहभागी झाले आहेत, लॉरेंस बिश्नोई देखील असाच एक गुन्हेगार आहे, तो देखील कॉलेजमध्ये शिकत असतानाच गँगस्टर बनला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP result update : कोल्हापुरातील पहिली अपडेट आली समोर, काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर; पाचगावचे संग्राम पाटील यांची आघाडी

Gold Rate Today : सोनं-चांदीचे भाव पुन्हा वाढले! चांदी 15,000 रुपयांनी महाग; जाणून घ्या ताजा भाव

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद विजयी

Sangli : काळाचा क्रूर घाला! भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीचा कारवर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू; माजी खासदारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, बोरगाववर शोककळा

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

SCROLL FOR NEXT