1971 Indo Pakistan War
1971 Indo Pakistan War Esakal
देश

Vijay Divas 2022 : आपल्याला युद्ध करावंच लागेल, इंदिरा गांधींनी देशवासीयांना केलेले भावनिक आवाहन!

सकाळ डिजिटल टीम

आज भारत आणि पाकिस्तान 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 16 डिसेंबर ला झालेल्या या युद्धाने बांगलादेशला स्वातंत्र्यांचा नवा सुर्य दाखवला आणि पाकिस्तानच्या माथी पराभवाचा शिक्का लागला. यामूळेच आज भारतीय विजय दिवस साजरा केला जातो. पाकिस्तानच्या पश्चिम आणि पूर्व भागात हे युद्ध सुरू असले, तरी या काळात पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्लेही करण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून 3 डिसेंबर 1971 मध्ये भारतानेही या युद्धात उडी घेत पाक लष्करावर जोरदार हल्ला चढवला.

या युद्धात तिन्ही सेना सक्रिय झाल्या आणि अखेर 16 डिसेंबरला ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांच्या आत्मसमर्पणाने हे युद्ध जिंकले. एवढेच नव्हे तर शेजारीच बांगलादेश हा नवा देशही उदयास आला. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीयांना एक संदेश दिला होता. काय म्हणाल्या इंदिरा गांधी.

मध्यरात्री देशाला संबोधित करताना इंदिरा गांधी म्हणाल्या की, देश आणि आपली जनता एका मोठ्या संकटातून जात आहे.  म्हणून मी तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी मी इथे आली आहे. पाकीस्तान आपल्या विरोधात नेहमीच कुरघोड्या करत आहे. आजही पाकिस्तानने आपल्या विरूद्ध युद्ध पुकारले आहे. काही तासांपूर्वीच संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पाकिस्तानने युद्धाला सुरूवात केलीय.

पाकिस्तानच्या हवाई दलाने अचानक आपल्या अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, अवंतीपूर, उत्तरलाई, जोधपूर, अंबाला आणि आग्रा हवाई तळांवर हल्ला चढवला आहे. याशिवाय सुलेमानखी, खेमकरन, पूंछ आणि इतर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसखोरी करून गोळीबार करत आहे.

1970 मधील मार्च महिन्यापासून आपण संपूर्ण जगाला ही समस्या शांततेने सोडवण्याचे आवाहन करत आहोत. लोकशाही मार्गाने ज्या लोकांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे. त्यांचे हक्क हवे आहेत, त्यांना ते शांततेने दिले जावेत. अशी आमची मागणी आहे. आज बांगलादेशातील युद्ध हे केवळ त्यांचे राहीले नसून ते आता आपल्याही प्रतिष्ठेचे बनले आहे.

हे युद्ध पाकिस्तानने माझ्यावर, माझ्या देशातील गोरगरीब जनतेवर आणि आपल्या स्वातंत्र्यावर लादले आहे. त्यामूळे पाकिस्तानच्या या युद्धाला सडेतोड उत्तर देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपले वीर जवान दुश्मनांना मातीत गाडण्यासाठी सीमेवर सज्ज आहेत. देश संरक्षणासाठी ते तत्पर आहेत. अशा परिस्थीतीत आवश्यक पाऊल उचलले जात आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत.

पुढे इंदिराजी म्हणाल्या की, संघर्ष आणि बलिदानासाठी आपल्याला नेहमीच तयार राहावे लागणार आहे. आपण शांतताप्रिय लोक आहोत, पण, जेव्हा कोणीतरी तूमच्या स्वातंत्र्यावर गदा आणायचा प्रयत्न करतो, त्या काळात तूम्ही शांत राहूच शकत नाही. म्हणूनच आज आपल्याला केवळ आपल्या स्वातंत्र्यासाठीच नाही तर देशाची मूलभूत तत्वे अधिक बळकट करण्यासाठीही लढावे लागणार आहे.

या अवाहनानंतर भारताने पाकीस्तानच्या मुस्क्या आवळल्या. आणि युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT