2 years old sujith stuck in bowerwell yesterday in Tamilnadu
2 years old sujith stuck in bowerwell yesterday in Tamilnadu 
देश

#SaveSujith 2 वर्षांचा सुजिथ अडकला बोअरवेलमध्ये; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

सकाळ वृत्तसेवा

तिरूचिरापल्ली : तमिळानाडूतील तिरूचिरापल्ली जिल्ह्यातील नदुकाटुपट्टी येथे 2 वर्षीय सुजिथ शुक्रवारी (ता. 25) बोअरवेलमध्ये पडला. 15 तास उलटूनही त्याला बोअरवेलमधू काढण्यात यश आलेले नाही. त्याला बाहेर काढण्यासाठी कालपासून प्रशासनाचे व पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

25 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये सुजिथ पडला. सुरवातीला तो 30 मिटर खोलीवर अडकला होता. पण खाली सरकत सरकत तो आता 70 मिटर खोल बोअरवेलमध्ये अडकला आहे. सुजित पडल्याची माहिती मिळताच बचावपथके घटनास्थळी दाखल झाले. त्याला समांतर खड्डा खोदून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या खड्ड्यातून शेजारील बोअरवेलमधून सुजिथला काढण्याचे बचावपथकाचे नियोजन आहे. याही बचावपथकात अडकाठी आली असून, 10 फूटांखाली खडक मध्ये आला असून खोदकाम थांबविण्यात आले आहे.

घटनास्थळी तमिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर, पर्यटन मंत्री वल्लामंदी नटराजन हे उपस्थित असून त्यांची सर्वाधिक चांगली यंत्रणा सरकारने सुजिथला काढण्यासाठी लावली आहे. 'आम्ही आमची सर्वोत्तम यंत्रणा सुजिथला बाहेर काढण्यासाठी लावली आहे. मुलाच्या श्वासाचा आवाज बाहेर येत आहे. बोअरवेलमध्ये एक मायक्रो कॅमेरा पाठवला आहे, जो त्याचे चित्रण करेल व माहिती देईल. आरोग्ययंत्रणा त्याला ऑक्सिजन देत आहे. 

घराबाहेर खेळताना साधारण 5 वाजेच्या दरम्यान सुजिथ बोअरवेलमध्ये पडला. तो सुखरूप बाहेर निघावा यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. तसेच ट्विटरवर #SaveSurjith हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT