Ria Dabi esakal
देश

वाह, क्या बात है! टाॅपर टीना डाबीच्या बहिणीचीही युपीएससीत बाजी

सकाळ डिजिटल टीम

UPSC परीक्षेत रिया डाबीनं तिच्या मेहनतीच्या जोरावर कुटुंबीयांचं नाव उज्ज्वल केलंय.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (Central Public Service Commission) 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल काल (ता. 25) जाहीर झाला. यात 761 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या परीक्षेत बिहारचा (Bihar) आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार (Shubham Kumar) देशात पहिला आला, तर परीक्षेत 2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी (Teena Dabi) यांची छोटी बहीण रिया डाबीनंही (Ria Dabi) मोठं यश मिळवलंय.

UPSC परीक्षेत रिया डाबीनं तिच्या मेहनतीच्या जोरावर कुटुंबीयांचं नाव उज्ज्वल केलंय. जरी ती तिच्या बहिणीसारखी अव्वल येऊ शकली नसली, तरी यूपीएससीत 15 वी रँक मिळवून ती देशाच्या सेवेत योगदान देण्यास तयार झालीय. IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहिणीच्या यशाबद्दल माहिती दिली. या तिच्या उल्लेखनीय कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.

या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर विनायक नरवाडे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT